web-ads-yml-728x90

Breaking News

संदीप काळे यांचे ‘ऑल इज वेल’ राज्यपालांच्या हस्ते प्रकाशित

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

युवा लेखक व पत्रकार संदीप काळे लिखित ‘ऑल इज वेल : मनातला सक्सेस पासवर्ड’ या पुस्तकाचे तसेच पुस्तकाच्या हिंदी व इंग्रजी आवृत्तीचे प्रकाशन शुक्रवारी (दि. १) राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे झाले.यावेळी केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती पवार, हिंगोलीचे खासदार हेमंत पाटील, सकाळचे मुख्य संपादक श्रीराम पवार व लेखक संदीप काळे उपस्थित होते.संदीप काळे यांच्या पुस्तकातून त्यांच्या आई वडिलांचा त्याग व तपस्या, तसेच त्यांचे प्रेम व परिश्रम दिसून येतात असे सांगून आई-वडील तसेच मातृभूमीला स्मरून समर्पण भावनेने कोणतेही कार्य केल्यास ते श्रेष्ठ ठरते असे राज्यपालांनी सांगितले. पुस्तकाच्या माध्यमातून युवा पिढी व लहान मुले प्रेरणा घेतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. राज्यपालांनी यावेळी संदीप काळे यांच्या आई वडिलांचा सत्कार केला.

No comments