web-ads-yml-728x90

Breaking News

‘बार्डो’ ला सर्वोत्तम मराठी चित्रपटाचा राष्ट्रीय पुरस्कार प्रदान

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइवदिल्ली

बार्डो’ या मराठी चित्रपटाला 67 वा राष्ट्रीय चित्रपट पुरस्‍कार देऊन आज उपराष्ट्रपती वैकंया नायडू यांनी गौरव केला. नर्गिस दत्त राष्ट्रीय एकात्मता पुरस्कारासाठी ‘ताजमाल’ तर सामाजिक विषयावरील सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून ‘आनंदी गोपाळ’ या मराठी सिनेमाला पुरस्कार प्रदान करण्यात आला.विज्ञान भवनात 67 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार वितरण कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. या प्रसंगी केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्री अनुराग ठाकुर, केंद्रीय राज्यमंत्री डॉ. एल. मुरूगन, माहिती व प्रसारण विभागाचे सचिव अपूर्व चंद्रा आणि अन्य मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.  आज दिले गेलेले पुरस्कार वर्ष 2019 चे आहेत. सुप्रसिद्ध तसेच बहुभाषिक अभिनेता रजनीकांत यांना आज दादासाहेब फाळके पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. त्यांनी कन्नड, तेलगु, तमिळ, हिंदी, मल्ल्याळम, इंग्लिश, बंगाली या भाषेतील सिनेमांमध्ये अभिनय केलेला आहे. रजनीकांत यांचे मुळ नाव शिवाजीराव रामोजीराव गायकवाड असून ते कर्नाटक राज्यातील बंगळूर येथील मराठी कुटूंबातील आहेत. त्यांची चित्रपट सृष्टीतील कारर्कीद 1975पासून सुरू केली.अभिनेता मनोज वाजपेयी यांना ‘भोसले’ या हिंदी चित्रपटासाठी तर दक्षिण भारतीय अभिनेता धनुष्य यांना ‘असुरन’ यांना तमिळ चित्रपटासाठी यावर्षीचा उत्कृष्ट अभिनेता श्रेणीतील पुरस्कार विभागुन प्रदान करण्यात आला. अभिनेत्री कंगना रणावत यांना ‘मणिकर्णिका द क्वीन ऑफ झाँसी’ आणि ‘पंगा’ या दोन चित्रपटातील उत्तम अभिनयासाठी यावर्षीचा सर्वोत्कृष्ट अभिनयाचा पुरस्कार प्रदान करण्यात आला.

No comments