महाराष्ट जनुक कोष कार्यक्रम देशाला दिशा देणारा प्रकल्प – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
BY - युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई
महाराष्ट्र जनुक कोष (जीन बँक) कार्यक्रम राबविणारे आपले राज्य देशातील पहिले आहे. या कोषाबाबत राजीव गांधी विज्ञान आणि तंत्रज्ञान आयोगाने मजबूत पाया बनविला आहे. या कार्यक्रमामधून देशाला दिशा दाखविण्याची अभिमानास्पद कामगिरी केली जाते आहे, असे गौरवोद्गार काढतानाच, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी हे काम अव्याहतपणे सुरु राहावे यासाठी राज्याच्या अर्थसंकल्पात कायमस्वरुपी तरतूद करण्याचे निर्देश आज येथे दिले. ‘हे काम म्हणजे आपले भवितव्य आणि भविष्यासाठी आहे. वातावरणीय बदलाच्या आव्हानात्मक परिस्थितीला तोंड देणाऱे पिकांपासून ते मासे, पशुधन यांचे वाण जतन संवर्धनाचे प्रयत्न करावेच लागतील, असेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी नमूद केले.आयोगाच्या वतीने महाराष्ट्र जनुक कोष (जीन बँक) कार्यक्रम प्रकल्पाचा कार्यपूर्ती अहवाल आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत वर्षा येथील समिती सभागृहात सादर करण्यात आला.
No comments