web-ads-yml-728x90

Breaking News

जागतिक दर्जाशी स्पर्धा करणारे विद्यार्थी घडवावेत : उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

माहिती तंत्रज्ञानाच्या युगात शिक्षण क्षेत्रात तीव्र स्पर्धा असून काळाची गरज लक्षात घेता शिक्षण संस्थांनी जागतिक दर्जाशी स्पर्धा करतील असे विद्यार्थी घडवावेत, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.पुणे जिल्हा शिक्षण मंडळाची वार्षिक सर्वसाधारण सभा उपमुख्यमंत्री श्री. पवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करण्यात आली होती. त्यावेळी ते बोलत होते. सभेला आमदार अशोक पवार, माजी आमदार विलास लांडे, उपाध्यक्ष राजेंद्र घाडगे, मानद सचिव ॲड. संदीप कदम यांच्यासह संस्थेचे पदाधिकारी होते.

No comments