web-ads-yml-728x90

Breaking News

भाजपच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर सचिवपदी सुनिल सकट यांची नियुक्ती

 


BY : युवा महाराष्ट्र लाईव। अहमदनगर

 सामाजिक कार्यकर्ते सुनिल भिमराव सकट यांची भारतीय जनता पार्टीच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली. गांधी मैदान येथील भाजपच्या पक्ष कार्यालयात भाजप अनुसूचित जाती मोर्चाच्या पद नियुक्ती कार्यक्रमात सकट यांच्या नियुक्तीची घोषणा करुन अनुसूचित जाती मोर्चाचे उत्तर महाराष्ट्र प्रभारी वाल्मिक निकाळजे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. यावेळी भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष महेंद्र उर्फ भैय्या गंधे, अनुसूचित जाती मोर्चाचे शहराध्यक्ष चंद्रकांत पाटोळे, राज्य सचिव मनेष साठे, विवेक नाईक, माजी नगरसेवक सुवेंद्र गांधी आदी भाजपचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

सुनिल सकट मागासवर्गीय समाजातील विविध प्रश्‍न सोडविण्यासाठी कार्य करत आहेत. समाजातील विविध प्रश्‍न मार्गी लावण्यासाठी शासनस्तरावर त्यांचा पाठपुरावा सुरु आहे. दुर्बल घटकांना न्याय, हक्क मिळवून देण्याकरिता त्यांचे सातत्याने प्रयत्न सुरु असून, लहूजी शक्ती सेनेचे जिल्हा कार्याध्यक्ष म्हणून ते काम पाहत आहेत. कोरोनाच्या संकटकाळात त्यांनी गरजूंना अन्न-धान्य, मास्क व सॅनीटायझरचे वाटप केले. कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जनजागृती केली. गरजू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्याची मदत केली.महामारी काळात रक्तदान,वृक्षरोपन करुन रोपांचे वाटप केले. या कार्याची दखल घेत त्यांची भाजपाच्या अनुसूचित जाती मोर्चाच्या शहर सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पदाच्या माध्यमातून समाजातील प्रश्‍न सोडविण्यासाठी व गरजूंना आधार देण्यासाठी प्रयत्नशील राहणार असून, पक्षाची ध्येय-धोरण शेवटच्या घटका पर्यंत पोहचविणार असल्याची भावना सकट यांनी व्यक्त केली. या निवडीबद्दल त्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.  

No comments