web-ads-yml-728x90

Breaking News

डॉक्टर प्रमोद पष्टे यांचे रॉयल हॉस्पिटल ठरतोय मुरबाडकराचां वटवृक्ष

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

'' केल्याने होत आहे रे अधी केलेची पाहिजे '' हे जेव्हा आपण एैकतो किंवा म्हणतो तेव्हा आपला अम्तःआत्मा सुध्दा त्याकडे लक्ष केंद्रित करतो याचा आपल्याला अनुभव आहेतच.समाजाच्या प्रत्येक घटकात सर्व चांगल्या डॉक्टरांची आम्ही लेखणीतून प्रशंसाच करतो कारण त्याचे परिश्रम आणि जनतेबद्दलची अस्मिता जपणरी माणूसकी,नैतिकता भावना त्यांच्या कार्यशैलीतून दिसून येत असते.अशीच अहोरात्राची धडपड करतांना 24 तासाची अत्यावश्यक सेवा देणारे रॉयल हॉस्पिटलचे प्रमुख तज्ञ डॉक्टर म्हणून ओळख आहे ते म्हणजे डॉ.प्रमोद पष्टे.

      डॉ.प्रमोद पष्टे यांचे रॉयल हॉस्पिटल हे नागरिकांचे आधारवड झाले आहे.या रूग्णालयात आय.सि.यू,सर्जिकल,अपघात,फ्रॅक्श्‍चर व अन्य अत्यावश्यकावर उपचार केले जात असून गरिब गरजूंना मदतही या रूग्णालयात केले जाते.एखादा गरिब आला तर त्याला प्रथम बरं करण्यावर त्यांचे लक्ष असतं.त्यांनी केवळ माणूसकी झरी जपण्यास घेतली असून येथिल रॉयल रूग्णालयात अनेकांना जीवनदान मिळाले आहे.कोणतीहा सिरीअस रूग्ण आला की त्याचे उपचार करण्यासाठी या ठिकाणी सर्व डॉक्टर व परिचारिका बरोबर सहकारी रूग्णाचे जीव वाचविण्यासाठी शक्तीपणाला लावतात यातूनच कळते की डॉ.प्रमोद पष्टे यांचा सर्वसामान्य जनतेला आधार असून हे एक आधार वटवृक्षच आहे. डॉ.प्रमोद पष्टे यांचेकडे आजारीहून आलेला रूग्ण स्वतःच्या पायावर बरा होऊनच जातो.कोरोना प्रादुर्भावात ज्या ज्या व्यक्तींना कोरोना झाला त्यांनी डॉ.प्रमोद पष्टे यांच्याकडे धाव घेऊन जीव वाचविण्याची हाक मारली तेव्हा मोठ मोठे तज्ञ डॉक्टर,एम.डी.फिजिशियन यांच्या सोबत स्वतः डॉ.प्रमोद पष्टे यांनी त्या त्या व्यक्तींना कोरोनामुक्त केले आहेत याचमुळे ज्या ज्या प्रकारे रूग्ण या रॉयल हॉस्पिटलमधून बरे झालेत त्यांनी केवळ डॉ.पष्टे यांचेच नावाची माळा जपली आहे.

     नेहमी हसरा चेहरा समोर ठेवून दुखःला बाजूला सारून अनेकांशी त्यांचा जिव्हाळा कौटूंबिक सदस्याची भावना रूजवत आहे.प्रत्येक यशस्वीमागे त्यांचे गुरूचे हात असते असे डॉ.प्रमोद पष्टे यांच्या यशामागे त्यांचे आई - वडिलांचा आशिर्वाद,जनतेचा विश्‍वास आणि साथ असल्यानेच या यशाचा शिखर गाठला गेला असल्याचे त्यांनी मागील करण्यात आलेल्या पुरस्कारात म्हंटले आहे.डॉ.प्रमोद पष्टे यांच्या कार्यशैलीची प्रणाली ही मोठी असून एका कोणही तिथवर पाहोचला असेल परंतु तिथवर पाहोचण्यासाठी काय परिश्रम घ्यावे लागते याची जाण डॉ.पष्टे यांना अनुभवातुन आली आहे.कधी कोणाला विरोध नाही,कोणासोबत भांडणं नाही केवळ काम एके काम करून जनतेची सेवा करणे हेच प्रामुख्याचे ध्येय राहिले आहे.त्यांना चांगल्या लोकांची साथ आणि वरिष्ठांचे मार्गदर्शन मिळत असून जनतेच्या सेवेला त्यांची डॉक्टरकी वाहून घेतली आहे.त्यांच्या याच कामाला पाहून कोरोना प्रादुर्भावात उत्तमरित्या काम करून अनेक नागरिकांचे जीव वाचवून जीवदान दिल्याप्रकरणी त्यांचे कोरोना योध्दा म्हणून सन्मानित करण्यात आले.

No comments