web-ads-yml-728x90

Breaking News

छत्रपती शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य महाविद्यालय, पडघा येथे लसीकरण शिबीर उत्साहात संपन्न

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव भिवंडी

छत्रपती शिक्षण मंडळाच्या कला व वाणिज्य  महाविद्यालय, पडघा येथे  गुरुवार  दि. २८  ऑक्टोबर २०२१  रोजी मिशन युवा स्वास्थ  अभियाना अंतर्गत महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी कोव्हीड प्रतिबंधात्मक लसीकरण शिबीर आयोजित करण्यात आले.महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य विभाग आणि उच्च व तंत्र शिक्षण विभाग यांच्या यांच्या निर्देशानुसार  दि.२५ ऑक्टोबर २०२१ ते  २  नोव्हेंबर २०२१ हा कालावधी महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ अभियान म्हणून राबविण्यात येत आहे, त्यानुसार महाविद्यालाच्या प्राभारी प्राचार्य प्रा सावित्री क्रांतीकर यांनी महाविद्यालयातील प्राध्यापकांच्या बरोबर नियोजन करून सर्व विद्यार्थ्यांची लसीकरणाबाबतची माहिती गुगल फॉर्मव्दारे संकलित केली, प्राध्यापकांची समिती स्थापन करून विद्यार्थ्यांचे समुपदेशन करण्यात आले. लसीकरण शिबिराचे उदघाटन सकाळी १० वाजता संपन्न झाले , यावेळी  प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथील मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. अमोल भोर यांनी 'लसीकरणाबाबतची वस्तुनिष्ठ माहिती देऊन विद्यार्थ्यांना लसीकरणासाठी प्रोत्साहित केले'.महाविद्यालाच्या प्राभारी प्राचार्य प्रा. सावित्री क्रांतीकर , व्यवस्थापक श्री. जयंत सोनटक्के , प्रा. ज्योती भोई , राष्ट्रीय सेवा योजना कार्यक्रम अधिकारी तथा ठाणे जिल्हा झोन III जिल्हा समन्वयक प्रा. दिपक पोंक्षे, राष्ट्रीय सेवा योजनेच्या महिला कार्यक्रम अधिकारी सुजाता खंबायत  यांनी उपस्थित सर्वांचे स्वागत केले, दिवसभरात ४० हुन अधिक विद्यार्थ्यांनी लसीकरण करून घेतले.महाविद्यालयातील प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी शिबीर यशस्वी होण्या साठी केलेल्या प्रयत्नां मुळे आणि  प्राथमिक आरोग्य केंद्र पडघा येथील आरोग्य कर्मचारी यांच्या सहाकार्या मुळे  हे शिबीर यशस्वी  संपन्न झाले.

No comments