web-ads-yml-728x90

Breaking News

सद्यस्थितीचं भान राखण्याची गरज - प्रा डॉ शंकर अंभोरे.


 BY : युवा महाराष्ट्र लाईव - औरंगाबाद |

दिवसेंदिवस सरकारच्या धोरणात आमूलाग्र बदल होत असल्यामुळे सर्वसामान्यांनी परिस्थितीचे गांभीर्य लक्षात घेऊन भान राखणे गरजेचे आहे असे मत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या  मुप्टा संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रा डॉ शंकर अंभोरे यांनी व्यक्त केले. ते औरंगाबाद जिल्हा स्तरीय प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांच्या अधिवेशनात मार्गदर्शन करताना बोलत होते. नवीन शैक्षणिक धोरणात राखीव जागांचा पूर्णतः संपविण्यात आल्या असून वेळीच लोकांनी आपल्या प्रतीनिधित्वाबद्दल जागृत होणे आवश्यक आहे. या नवीन शैक्षणिक धोरणामुळे नोकऱ्यांचे प्रमाण कमी होणार असून अनेक शाळा, छोट्या शैक्षणिक संस्था व छोटी महाविद्यालये पूर्णतः संपुष्टात येणार आहेत.  बदललेल्या शैक्षणिक धोरणामुळे बहुजन वर्गाला शिक्षणापासून वंचित राहावे लागणार आहे तसेच शिक्षण महाग होणार असून शिक्षणाचे वेगाने खाजगीकरण होणार आहे असे मत प्रमुख वक्ते म्हणून मार्गदर्शन करताना त्यांनी मांडले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेत्तर कर्मचारी संघटनेचे कार्याध्यक्ष प्रा बी एल चव्हाण हे होते. त्यांनी अध्यक्षीय भाषणात कामगार कायदे नवीन शेतकरी धोरण व प्रोटॉन संघटनेची भूमिका याचा आढावा घेऊन सरकारच्या खाजगीकरणाच्या धोरणाला विरोध का करणे आवश्यक आहे हे सांगून सद्यस्थितीतील परिस्थितीचा परामर्श घेतला.


कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या प्रोटॉन संघटनेचे महासचिव प्रा डॉ भारत पगारे यांनी सर्वांचे स्वागत करुन कार्यक्रमाचे प्रास्ताविक केले. भारतीय पिछडा ओबीसी शोषित संघटन, नवी दिल्लीच्या औरंगाबाद विभागचे महासचिव प्रा डॉ कालिदास भांगे यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, राजर्षी शाहू महाराज, राष्ट्रपिता ज्योतिराव फुले व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमांचे पूजन करून अधिवेशनाचे उद्घाटन करण्यात आले. 


अधिवेशनात डॉ. माणिक वाघमारे, बामसेफचे पदाधिकारी श्री कसाब, ऍड अशोक उके, खोब्रागडे यांनी विचार व्यक्त केले. या अधिवेशनात शिक्षक, प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी सहभाग  घेतला होता. कार्यक्रमाच्या शेवटी प्रा डॉ. लक्ष्मीनारायण कुरपटवार यांनी उपस्थितांचे आभार मानले.

No comments