नागपूर शहरात भंडारा मार्गावर उड्डाणपूलाचा काही भाग कोसळला
BY - युवा महाराष्ट्र लाइव – नागपूर
शहरातील भंडारा मार्गावर असलेल्या पारडी परिसरातील निर्माणाधिन उड्डाणपूलाच काही भाग कोसळला आहे. दरम्यान, या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. टनास्थळी कळमना आणि पारडी पोलिसांचे पथक दाखल झाले असून, वाहतुकीची कोंडी सोडवण्याचे काम सुरू झाले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडून या पुलाचे काम सुरू आहे. हे काम गेल्या सात वर्षांपासून सुरू आहे. मात्र, पुलाच्या निर्माणाचे कार्य अतिशय संथ गतीने सुरू असल्याने या भागात नेहमीच वाहतूक कोंडी तयार होते. आज पुलाच्या दोन पिलरवर गर्डर टाकण्याचे कार्य सुरू असताना मशीनचे संतुलन बिघाल्याने गर्डरचा एक भाग खाली कोसळला ज्यामुळे हा अपघात झाला. मात्र, सुदैवाने या अपघातात कुणालाही ईजा झालेली नाही. पुलाचा भाग कोसळून अपघात झाल्याची माहिती परिसरातील लोकांना समजताच हजारो लोकांनी घटनास्थळी धाव घेऊन गर्दी केली आहे. पोलिसांनी गर्दी नियंत्रित केली असून वाहतुकीची कोंडी देखील सोडवण्यात आली आहे
No comments