web-ads-yml-728x90

Breaking News

घोलपाचा वारसा राष्ट्रीय काँगे्रसचा राज्य सचिव;राजेश घोलप यांच्यावर महाराष्ट्रातुन अभिनंदनाचा वर्षाव

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव ठाणे

आपले आयुष्य काँगे्रस मध्ये समर्पित केलेल्या स्व.माजी महसुलमंत्री शांतारामभाऊ घोलप यांचे वारस राजेश अनंतराव घोलप यांची राष्ट्रीय काँगे्रस पक्षाच्या महाराष्ट्र प्रदेश सचिव पदी नियुक्ती करण्यात आली आहे.

संपुर्ण राज्यात घोलप घराण्याची राजकीय ख्याती असलेले तसेच जिल्हा पातळीवरून राज्यपातळीवर कुशल नेतृत्व करणाया ॅड राजेश अनंतराव घोलप यांच्या निवडीने संपुर्ण महाराष्ट्रात अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.युवकांचे प्रेरणास्थान गोरगरीबाचा न्यायीक नेता अभ्यासू विश्वासू शासनाच्या योजना तळागळापर्यंत नेवून पक्षाच्या वाढीसाठी आपल्या घराण्याचं योगदान देणार्या राजेश अनंतराव घोलप यांची महाराष्ट्राच्या सचिव पदी झालेली निवड ग्रामीण भागातील काँगे्रस अधिक बळकट करणारी ठरणार आहे.प्रत्येकाला हक्काचा नेता शासनाकडे शेवटच्या घटकाला न्याय देण्याची पत्राता असा त्यांचा नावलौकीक अधिकच माणुसकीचं नातं घट्ट करणारं आहे.

स्व.शांतारामभाऊ घोलपाच्या नावाने आजचे आमदार खासदार लोकप्रतिनिधी घडतात जेव्हा काही नव्हतं तेव्हा ठाणे कोकणातुन स्वर्गिय इंदिरागांधी यशवंतराव चव्हाण गांधी घराणाच्या सोबत प्रामाणिक विकासीत कामे केली विविध प्रकल्प आणले खेडेगावाची शहरे केली.बैलगाडी सोबत मोटार गाडीचा प्रवास ज्यांनी सुरू केला त्याच स्व.महसुलमंत्री शांतारामभाऊ घोलपांचा वारस राजेश अनंतराव घोलप राष्ट्रीय काँगे्रसचा महाराष्ट्र सचिव पदी विराजमान झालाय हा मुरबाड ठाणे कोकणाचा बहुमान आहे.

 

No comments