web-ads-yml-728x90

Breaking News

कोकणच्या विकासाने भरारी घेतली, कोकणची संपन्नता जगासमोर येणार – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव सिंधुदुर्ग

आजपासून सुरू झालेल्या सिंधुदुर्ग विमानतळामुळे कोकणवासियांचे स्वप्न पूर्ण झाले आहे. खऱ्या अर्थाने कोकणच्या विकासाने आजपासून भरारी घेतली आहे. जगभरातील पर्यटक कोकणात येतील आणि कोकणची संपन्नता जगासमोर येणार आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले.नागरी विमान वाहतूक मंत्रालय, महाराष्ट्र शासन महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळ आणि आयआरबी इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलपर्स लि. यांच्या संयुक्त विद्यमाने उड्डाण प्रादेशिक संपर्कता योजना अंतर्गत ग्रिनफिल्ड विमानतळ सिंधुदुर्ग प्रकल्पाचा लोकार्पण सोहळा मुख्यमंत्री उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते, दिल्ली येथून ऑनलाईन सहभागी झालेल्या नागरी विमान वाहतूक मंत्री ज्योतिरादित्य सिंधिया यांच्या अध्यक्षतेखाली, सुक्ष्म लघु आणि मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे, सामाजिक न्याय सक्षमीकरण राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या उपस्थितीत झाला. यावेळी उपमुख्यमंत्री अजित पवार, महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, उद्योग मंत्री सुभाष देसाई, कृषी मंत्री दादाजी भुसे, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे, परिवहन मंत्री ॲड. अनिल परब, पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे, खासदार अरविंद सावंत, जिल्हा परिषद अध्यक्ष संजना सावंत, आमदार निरंजन डावखरे, अनिकेत तटकरे, दीपक केसरकर, वैभव नाईक, नितेश राणे आदी उपस्थित होते.

No comments