web-ads-yml-728x90

Breaking News

‘सर्च’च्या शोधग्राम प्रकल्पातील कामे प्रशासकीय यंत्रणेसाठीही पथदर्शी – राज्यपालांकडून प्रशंसा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

गडचिरोलीसारख्या अतिदुर्गम आणि आदिवासी भागात डॉ. अभय बंग आणि डॉ. राणी बंग या दांपत्याच्या नेतृत्वाखाली सर्च संस्थेतर्फे विविध माध्यमातून सुरू असलेले सेवाभावी कार्य प्रशासनासाठीही पथदर्शी असल्याचे गौरवोद्गार राज्याचे राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी आज गडचिरोली जिल्ह्यातील चातगाव येथे ‘सर्च’ संस्थेच्या शोधग्राम या प्रकल्पाला सदिच्छा भेट दिली. सर्च संस्थेद्वारा विविध माध्यमातून सुरु असलेले काम त्यांनी जाणून घेतले.  डॉ.अभय बंग व डॉ. राणी बंग यांच्याशी विविध उपक्रमांबाबत अनौपचारिक चर्चाही  केली . तसेच शस्त्रक्रिया होऊन बऱ्या झालेल्या रूग्णांसोबतही राज्यपाल श्री. कोश्यारी यांनी संवाद साधला व उपचार सुविधांबाबत माहिती जाणून घेतली.

No comments