web-ads-yml-728x90

Breaking News

नूतन इमारतीमधून लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणीसोबतच लोकाभिमुख कारभार व्हावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव – पुणे

लोककल्याणकारी योजनांच्या प्रभावी अंमलबजावणी सोबतच लोकाभिमुख कारभार आंबेगाव पंचायत समितीच्या नूतन सुसज्ज इमारतीतून व्हावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले. घोडेगाव येथे सार्वजनिक सभागृहासाठी 10 कोटी रुपयांचा निधी देणार असल्याची घोषणाही त्यांनी केली.आंबेगाव पंचायत समितीच्या नवीन इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, खासदार डॉ.अमोल कोल्हे, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, आमदार अतुल बेनके, माजी खासदारशिवाजीराव आढळराव पाटील आदी उपस्थित होते.  पायाभूत सुविधासाठी निधी कमी पडू देणार नाही असे सांगून उपमुख्यमंत्री श्री.पवार म्हणाले, आंबेगाव पंचायत समितीची नवी इमारत देखणी व शहराच्या वैभवात घर घालणारी आहे.या इमारतीच्या फर्निचरसाठी आवश्यक निधी देण्यात आला आहे, लवकरच फर्निचरचे काम पूर्ण होईल.नागरिकांचे प्रश्न तेवढ्याच तत्परतेने सोडवले गेले पाहिजेत. या इमारतीतून होणारा प्रत्येक निर्णय सर्वसामान्य  नागरिक, शेतकरी, कष्टकरी यांच्या विकासाला चालना देणारा असावा, अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

No comments