web-ads-yml-728x90

Breaking News

वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता – पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

अक्षय ऊर्जेचा वापर वाढविणे आणि प्रदूषण कमी करणे यावर राज्य शासनाचा भर असून वातावरणीय बदलाच्या अनुषंगाने शासनाने विविध महत्त्वपूर्ण उपाययोजनांच्या अंमलबजावणीस सुरूवात केली असल्याचे पर्यावरण आणि वातावरणीय बदल मंत्री आदित्य ठाकरे यांनी सांगितले. वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी जागतिक पातळीवर सर्व देशांनी एकत्र येण्याची आवश्यकता असल्याचे श्री. ठाकरे म्हणाले.वातावरणीय बदलांवर नियंत्रणासाठी विचारांची देवाणघेवाण करण्याच्या उद्देशाने महाराष्ट्र आणि स्वीडन दरम्यान सह्याद्री अतिथीगृह येथे शाश्वतता पुढाकार कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले. या कार्यशाळेस स्वीडनच्या मुंबईतील महावाणिज्यदूत एना लेकवल, वाणिज्य दूत एरीक माल्मबर्ग, राज्याच्या उद्योग विभागाचे अपर मुख्य सचिव बलदेव सिंग (दूरदृश्य प्रणालीद्वारे), पर्यावरण विभागाच्या प्रधान सचिव मनीषा म्हैसकर, एमआयडीसीचे मुख्य कार्यकारी अधिकारी पी.अन्बलगन, माझी वसुंधराचे अभियान संचालक सुधाकर बोबडे आदी उपस्थित होते.

No comments