web-ads-yml-728x90

Breaking News

कलम 370 हटल्याने काश्मीर घाटीत विकासाचे मार्ग खुले झाले - मोहन भागवत

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव नागपूर

जम्मू-काश्मीरमधून कलम 370 हटवल्यापासून सर्वांसाठी विकासाचा मार्ग खुला झाला आहे. 370 नावावर जो भेदभाव मोठ्या प्रमाणात केला जात होता आता राहिला नाही, असे भाष्य राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांनी केले. ते नागपुरात पुस्तक प्रकाशन सोहळ्याप्रसंगी बोलत होते. आधुनिक लडाखचे निर्माता कुशोक बकुला यांच्या जीवनावर आधारित हेमा नागपूरकर आणि कलम 370 वर आधारित डॉ. अवतार रैना लिखित पुस्तकांचे विमोचन सरसंघचालक मोहन भागवत यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी दोन्ही लेखकांचा सत्कारही जमू काश्मीर अध्ययन केंद्राच्यामार्फत सत्कारही करण्यात आला. यावेळी मंचावर सचिव अभिनंदन पळसपुरे उपस्थित होते.

No comments