web-ads-yml-728x90

Breaking News

मिशन युवा स्वास्थ;महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी मुरबाड शिवळे कॉलेज मध्ये कोविड 19 लसीकरण मोहीम

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइवमुरबाड,ठाणे

महाराष्ट्र शासनाच्या आरोग्य व उच्च व तंत्र शिक्षण विभागामार्फत राज्यातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांचे 100% लसीकरण करून द्वितीय सत्रापासून महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज पूर्ण क्षमतेने सुरू करण्याच्या हेतूने “युवा स्वास्थ्य अभियान” हाती घेतले आहे. सदरचे अभियान दिनांक २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१  या कालावधीत संपन्न होणार आहे. ठाणे जिल्हा नॅक समन्वयक डॉ. विनोद नारायणे  सदर अभियानाची माहिती देताना म्हणाले की,  महाराष्ट्र शासनाच्या वतीने हाती घेण्यात आलेले सदरचे अभियान खूपच कौतुकास्पद आहे.  या अभियानामुळे  जिल्ह्यातील सर्व महाविद्यालयांचे शैक्षणिक कामकाज द्वितीय सत्रापासून पूर्ण क्षमतेने सुरू करण्यासाठी मदत होणार आहे. त्यामुळे त्यांनी मा. मुख्यमंत्री श्री. उद्धवजी ठाकरे, मा. शिक्षण मंत्री श्री. उदयजी सामंत, मा. आरोग्यमंत्री श्री. राजेशजी टोपे, मा. पर्यावरणमंत्री श्री. आदित्यजी ठाकरे, मा. शिक्षण सहसंचालक डॉ. संजय जगताप, ठाणे  जिल्ह्याचे मा. जिल्हाधिकारी श्री राजेश जे नार्वेकर , जिल्हा आरोग्याधिकारी मा. डॉ. मनीष रेंगे  , जिल्हा आरोग्य वैद्यकीय अधिकारी  मा. डॉ. राणी शिंदे  आणि अन्य मान्यवरांचे आभार मानले.  

ते पुढे म्हणाले की  कोकण विभागीय शिक्षण सहसंचालनालयाचे माननीय शिक्षण  सहसंचालक डॉ. संजय जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली आणि नेतृत्वाखाली कोकणातील सर्वच जिल्ह्यांकरिता टास्क फोर्स तयार करण्यात आला आहे.  ठाणे  जिल्ह्या करिता तयार करण्यात आलेल्या टास्क फोर्समध्ये  डॉ. सुचित्रा नाईक  (जोशी बेडेकर महाविद्यालय ठाणे तालुका), डॉ. अविनाश पाटील (बी. के बिर्ला महाविद्यालय, कल्याण तालुका), डॉ.  मंजू पाठक  (CHM महाविद्यालय, उल्हासनगर तालुका), डॉ. विष्णू फूलझेले (सोनुभाऊ बसवंत महाविद्याल, शहापूर तालुका), डॉ. वैदेही दफ्तारदार (आदर्श महाविद्यालय अंबरनाथ तालुका), डॉ. शंकर पाटील  (शिवळे महाविद्यालय, मुरबाड  तालुका) डॉ. अशोक वाघ (बी. एन एन महाविद्यालय,भिवंडी निजामपूर तालुका)   आदी मान्यवर प्राचार्यांची सदर अभियानाकरिता  कोकण विभागीय सहसंचालनालयामार्फत  तालुका समन्वयक म्हणून  नेमणूक करण्यात आली आहे. तसेच ठाणे  जिल्हा आरोग्य अधिकारीडॉ. मनीष रेंगे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्ह्यातील आरोग्य विभाग देखील सदर अभियानासाठी पूर्ण क्षमतेने सज्ज झाला आहे.

ठाणे  जिल्ह्यातील कोणत्याही महाविद्यालयात शिक्षण घेणार्‍या  तसेच जिल्ह्याच्या बाहेर शिक्षण घेणाऱ्या मात्र ठाणे  जिल्ह्यात राहणाऱ्या सर्वच पात्र विद्यार्थ्यांनी आणि अध्यापकांनी सदर लसीकरणाचा लाभ घ्यावा असे आवाहन जिल्हा समन्वयक डॉ. विनोद नारायणे  यांनी महाराष्ट्र शासनाच्या वतीने केले आहे.  ते पुढे म्हणाले की या अभियाना अंतर्गत 18 ते  45 वयोगटातील एकही डोस न घेतलेल्या  आणि अभियान कालावधीत द्वितीय डोस घेण्यास पात्र असणाऱ्या  विद्यार्थ्यांचे लसीकरण प्रामुख्याने केले जाणार आहे.  याशिवाय  डोस शिल्लक राहिल्यास  परिसरातील संबंधित वयोगटातील नागरिक त्याचा लाभ घेऊ शकतात. ठाणे  जिल्ह्यातील विद्यार्थी मोठी  संख्या विचारात घेता सदरची लसीकरण मोहीम संपूर्ण कालावधीसाठी राबविण्याची गरज  आहे. त्यामुळे पात्र विद्यार्थ्यांनी आपल्या जवळच्या महाविद्यालयाशी संपर्क साधावा आणि दिनांक २५ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर २०२१ या कालावधीत १०० % लसीकरण करण्यासाठी सामाजिक जबाबदारीतून आपल्या पातळीवर विशेष प्रयत्न करावेत, असे आवाहन डॉ. विनोद नारायणे  यांनी शासनाच्या वतीने केले  आहे. विद्यार्थ्यांनी त्यांचे आधार कार्ड किंवा त्याची प्रत नोंदणीकरनासाठी जवळ बाळगावी आणि मिशन युवा स्वास्थ्य  अंतर्गत लसीकरण योजनेचा बहुसंख्येने लाभ घ्यावा असे त्यांनी नमूद केले. ज्या विद्यार्थ्यांच्या मनात काही शंका आहेत असे विद्यार्थी डॉ. विनोद नारायणे  यांच्याशी ९९८७०८४७९७ या क्रमांकावर संपर्क साधू शकतात.

 

No comments