web-ads-yml-728x90

Breaking News

उल्हासनगरमध्ये डान्स बारवर कारवाई, 17 बारबाला ताब्यात!


BY : युवा महाराष्ट्र लाईव - उल्हासनगर |

 उल्हासनगरच्या 17 सेक्शन चौकाजवळ चांदनी नावाचा बार आहे. या बारमध्ये बारबाला बिभत्स नृत्य करत असल्याची माहिती उल्हासनगर गुन्हे शाखेला मिळाली होती. त्यानुसार गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक महेश तरडे यांनी स्वतः पथकासह शनिवारी रात्री उशिरा या बारवर धाड टाकली.

बारबाला, वेटर, ग्राहकांवर कारवाई

यावेळी बारमध्ये 17 बारबाला अश्लील हावभाव करत नृत्य करत असल्याचं समोर आल्यानं या बारवर कारवाई करण्यात आली. यावेळी 17 बारबाला, 13 वेटर्स आणि 10 ग्राहकांना गुन्हे शाखेनं ताब्यात घेतलं.

उल्हासनगर शहरात अनेक डान्सबार असून एक दिवस कारवाई झाली की पुन्हा दुसऱ्या दिवशीपासून हे बार सुरू होतात. त्यामुळे बारवर कडक कारवाई करण्याची गरज निर्माण झाली आहे

No comments