पवाळे नानकसवाडी वन जागेत दगडखाण भाजपा अनुसुचित जाती मोर्चा अध्यक्षाची तक्रार
BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव – मुरबाड
संबधित विभागाची कोणत्याही प्रकारे परवानगी नसताना पवाळे नानकासवाडी येथील नविन शर्तच्या जागेत दगडखाण सुरू असुन लाखो रूपायाची रॉयल्टी चोरी झाली आहे या संबधी भाजपा अनुसुचित जाती मोर्चाचे मुरबाड तालुका अध्यक्ष आण्णा साळवे यांनी संबधित विभागाकडे लेखी तक्रार करून कारवाईची मांगणी केली आहे.
पवाळे नानकसवाडी येथील वनविभागाच्या नविनशर्त जागेत दगडखाण वनअधिकार्याच्या आर्शिवादाने सुरू असल्याचा आरोप आण्णा साळवे यांनी केला आहे.दगडखाण उत्खन्न करणार्यावर लवकरात लवकर कारवाई करा अन्यथा वरिष्ठाकडे दाद मागू असे आण्णा साळवे यांनी आपल्या निवेदनात म्हंटले आहे.
No comments