web-ads-yml-728x90

Breaking News

‘महा आवास’ योजनेंतर्गत दर्जेदार घरकुले बांधली जावीत; समाजातील गरजू व्यक्तीलाच फायदा मिळावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव पुणे

माणसाची अन्न, वस्त्र व निवारा ही मूलभूत गरज आहे. आयुष्यामध्ये प्रत्येकाचे घर बांधण्याचे स्वप्न असते.  पुणे जिल्ह्याला एक आगळेवेगळे महत्त्व आहे. पुणे जिल्हा विकासाच्या कामामध्ये मागे राहू नये. केंद्र, राज्याच्या योजनांचा फायदा खरोखरच लाभार्थी असलेल्यांनाच मिळाला पाहिजे, या पध्दतीचे काम प्रशासनाने करावे. या विविध घरकुल योजनांतर्गत देण्यात येणारी घरकुले दर्जेदार असावीत, अशा सूचना उपमुख्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अजित पवार यांनी आज दिल्या.‘महा आवास अभियान ग्रामीण’ अंतर्गत उत्कृष्ट काम करणारे तालुके, ग्रामपंचायत, क्लस्टर, बहुमजली इमारत व गृहसंकुलासाठीचे जिल्हास्तरीय पुरस्कार वितरण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते. यावेळी पुणे जिल्हा परिषेदेच्या अध्यक्षा निर्मला पानसरे, उपाध्यक्ष रणजीत शिवतारे, विभागीय आयुक्त सौरभ राव, जिल्हाधिकारी राजेश देशमुख, मुख्य कार्यकारी अधिकारी आयुष प्रसाद, पुरस्कार प्राप्त तालुक्यांचे गटविकास अधिकारी, तसेच सरपंच, ग्रामसेवक उपस्थित होते.

No comments