web-ads-yml-728x90

Breaking News

कच्छी भानुशाली समाजाचे कोरोना काळातील सेवाकार्य कौतुकास्पद : राज्यपाल भगत सिंह कोश्यारी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

व्यापार उदीमाद्वारे धनसंग्रह करून वाडी-इमल्या बांधणे कठीण काम नाही. परंतु ईश्वर कृपेने मिळालेली धनसंपदा आपल्याच उपेक्षित समाजबांधवांमध्ये निःस्वार्थीपणे वाटणे हे श्रेयस्कर काम आहे, असे सांगून कच्छी भानुशाली समाजाने कष्टार्जित संपत्तीतून कोरोना काळात समाजासाठी केलेले सेवाकार्य कौतुकास्पद आहे, असे प्रशंसोद्गार राज्यपाल भगत सिंह कोश्यारी यांनी आज येथे काढले.स्त्रियांसाठी कार्य करणारे जेडल फाउंडेशन व कच्छी भानुशाली सेवा समाजाच्या माध्यमातून कोरोनाकाळात उल्लेखनीय सेवाकार्य करणाऱ्या 37 कोरोना योद्ध्यांचा राज्यपालांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. राज्यपालांचा यावेळी कच्छी टोपी व शाल देऊन सत्कार करण्यात आला.कार्यक्रमाला जेडल फाउंडेशनच्या अध्यक्षा विजया चांद्रा, कच्छी भानुशाली सेवा समाज न्यासाचे अध्यक्ष नरेश सेठीया, वल्लभदास भद्रा, डोंबिवली कच्छी भानुशाली मित्र मंडळाचे विश्वस्त – छायाचित्रकार नवीन भानुशाली, अनिल भद्रा आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments