web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड सार्वजनिक बांधकाम विभागाच्या दिव्यांग अभियंतानी कोटी रूपायाची काढली बिले;बढतीसाठी दिव्यांग यादीत सरकारने चौकशी करावी

 

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

जनतेच्या पैशावर राजकीय प्रशासकीय मौजमजा करून विकासाचा आव आणणार्यानी दिव्यांग उपअभियंताला हाताशी धरून कोटी रूपायाची बोगस कामाची खोटी बिले काढली आहेत.त्याच आवक जावक रजिस्टर मुरबाड उपविभागीय कार्यालयातुन गायब झाल्याची माहिती माहिती अधिकार कायदयातंर्गत मागितेल्या माहितीत उघड झाले आहे.

  गेले 40 वर्षे प्रत्येक स्थानिक आमदाराच्या तसेच विरोधी पक्षाच्या ठराविक पदाधिकारी ठेकेदाराना टेंडर कामे वाटप करून शासनाचे कोटी रूपये टक्केवारी ठेकेदारीने कमवून स्वताला विकासाचं चांगल्या कामाचे प्रशासक नेते म्हणुन घेणार्याचा प्रवास आजही सराससुरू आहे त्याकडे महाविकास अघाडीच्या देशात पाचवा क्रमांक कमविलेल्या मुख्यमंञ्यानाही भ्रष्टाचारावर कारवाई करण्याचा धाडस झालं नाही.

   मुरबाड विधानसभा मतदार संघ म्हणजे ठेकेदार टक्केवारी यांचा सार्वजनिक बांधकाम विभाग अडडाच यावरच सार्याचे कार्यक्रम निवडणुका वाढदिवस सोहळे साजरे होतात.हाच धडा प्रत्येक उपअभियंता ,शाखा अभियंता आजही गिरवत आहेत तसाच प्रकार प्रत्यक्षात चांगल धाडधाड बोलणारा कानाने प्रखट एैकणारा डोळयानी चक्क पहाणार सुरळीत हातपाय हालवणारा आणि ठेकेदारांबरोबर खाजगी रूमवर राहणारा उपअभियंता सत्यजित कांबळे आणि शाखा अभियंता सुर्यभान आल्टे यांनी भ्रष्टाचाराचा कुरान मुरबाडला निर्माण करून मुख्यमंञ्याच्या नावानेही भ्रष्टाचार केला आहे.माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुरबाडला आले होते.

         मात्र त्यानी शासकीय विश्रामगृहामध्ये पाय ठेवला नसताना तेव्हा पासुन आज पर्यंत पाच वर्षे फडणवीसांच्या नावाने काढलेल्या पैशाचा काम अद्याप सुरू आहे.एकावर एक असे अनेक टेंडर काढले काही भाजपाच्या कालावधीत काही महाविकास अघाडीच्या कालावधीत परंन्तु अद्यापही कोणीही चौकशी करून कारवाई केलेली नाही.

  मुरबाडला भाजपाचे आमदार असताना दिव्यांग अधिकारी सत्यजित कांबळे,सुयभान आल्टे शाखा अभियंता भाजपाच्या ठेकेदाराना जवळ घेवुन टेंडर मॅनेजकरून भ्रष्टाचाराची कामे करत आहेत त्यावर कारवाई होत नाही परंन्तु मुरबाड शहरातील पंचायत समितीच्या समोरील संरक्षण भिंतीचे काम कालावधीत सुरू झाला नाही म्हणुन 7 लाखाच्या कामाला 10 लाखाचा दंड याच अपंग सत्यजित यांनी केला आहे.भाजपा कालावधीतील तीन लाख सहा लाख पासुन अनेक कामे झाली नाहीत काही कामे अपुर्ण आहेत काही कामे बोगस असताना खोटया एमबी बनवुन संपुर्ण डिव्हीजन मधुन पनवेल येथे एकाच ठिकाणी राहाणार्या आणि सुभाषच्या टोळक्यात ठेकेदारी घरी राहुन भ्रष्टाचार करणार्या उपअभियंता सत्यजित कांबळे शाखा अभियंता सुर्यभान आल्टे या दोर्घनिच काम केले आहे.

     त्यांना स्थानिक लोकप्रतिनिधी पाठिशी घालत असुन देशाचे केंन्द्रीयमंत्री पंचायत राज पालकमंत्री काँगे्रसचे सार्वजनिक बांधकाम मंत्री ठाणे जिल्हयाचे वरिष्ठ अधिकारी यांनी जाब विचारला नाही हे मुरबाडकराचं दुदैव आहे.ऐकामेकाच्या हातात दांडा आहे सारे ठेकेदारी बिरारीचे असल्याने बाबा दादाला बोलू शकत नाही आणि दादा बाबाला त्यातच सुहास येतो र्सुगंध देवुन र्सुभाष करून जातो उरला र् सुरला मोहनी बाबाच्या समोर उभा राहतो अशा भ्रष्टाचाराच्या चळवळीत मुरबाड सार्वजनिक बांधकाम उपविभागानी माहिती अधिकारात आपील स्मरणपत्र देवुन माहिती दिली नसल्याने त्यांच्या विरोधात आता उपोषणाचा मार्ग आवलंबला आहे.

   प्रथम सरकारला जागे केले नंतर विरोधीपक्षाला तदनंतर स्थानिक लोकप्रतिनिधीना मात्र हामकरोसा कायदा ठेकेदारी टेंडर मॅनेज अधिकारीची टक्केवारी आजपर्यंत माहिती अधिकारात माहिती देवू शकले नाही.चौकशा कुठे झाल्या काय कारवाई झाली सारं गुलदस्त्यात ग्रामीण रूग्णालय ग्रामीण रूग्णालय रस्ता पत्राशेड इमारती टोकावडा ग्रामीण रूग्णालय मुरबाड मधील रस्ते गटारी शौचालय बागेश्वरी तलावसह मुरबाड मधील शेकडो रस्ते अन्य कामात काही कोटीचा भ्रष्टाचार करून अधिकायानी शंकराला अभिषेक घालुन पाप धुण्याचा प्रयत्न केला मात्र शंकराचा पुत्र कपील अखेर नाराज झालाच मात्र ठेकेदारीची प्रशासकीय मालिका थांबली नाही.

            सत्यजित कांबळे कान डोळा नाक हात पाय शारीरिकदृष्टया सुरक्षित दिसतो मात्र तो दिव्यांग आहे अपंग आहे अपंग असताना त्यानी मुरबाडला कोटीची कामे केली त्याचा विकासात चांगलाच हातभार लागला आहे.त्यांना कार्यकारी अभियंताची बढती अपंग म्हणुन मिळणार आहे.मात्र त्यांचा शारीरिक अपंगत्व दिव्यांग एवढया कोटीच्या कामात दिसुन आला नाही

          खरचं तो अपंग असेल तर शासनाने त्यांच्यावर मुरबाड सारख्या दरी खोडयात जंगल झापाटयात एवढी मोठी कामगिरी कशी सोपवली हयाचा विचार सुध्दा झाला पाहिजे ज्या दवाखाण्यात डॉक्टरानी दिव्यांग दाखला दिला त्याचाही सल्ला सत्यजित कांबळे यांनी घेवुन खेडयापाडयात फिरकल्यावर शारीरिक अपंगत्व वाढणार नाही याची काळजी घेतली पाहिजे मात्र काही सामाजिक नागरिकांनी त्याच्या दिव्यांग अपंगत्वाची भरती आणि त्यांना बढती याची चौकशी कागदपत्रातुन करण्यात यावी म्हणुन शासनाकडे पत्रव्यवहार तक्रार केली आहे.

 

No comments