web-ads-yml-728x90

Breaking News

चांगल्या प्रकारचे काम मुरबाड अंजनी गॅस एजन्सीने केल्याबद्दल सन्मानचिन्ह देऊन केला गौरव

 

BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

मुरबाड तालुक्यामध्ये आज अंजनी गॅस एजन्सी नामवंत असून गाव खेडे पाडयात विविध सुविधा देत प्रभवी ठरली आहे त्याची पोहोचपावती म्हणून त्यांचा ठाणे जिल्हयातून मुरबाड तालुक्यातील अंजनी गॅस एजन्सीला अधिक गॅस जोडणीबद्दल उत्कृष्ट कामगिरी म्हणून असा सन्मानचिन्ह देऊन सत्कार केला

     गेल्य अनेक वर्षापासून अंजनी गॅस मुरबाड एजन्सीचे मालक श्री.सोमनाथभाऊ घरत यांनी मुरबाड तालुक्यामध्ये सेवा दिली आहे.याच सेवेची दखल अंजनी गॅस कंपनीने घेतली असून त्यांनी गॅस जोडणीमध्ये अव्वल स्थान मिळविले आहे.या अंजनी गॅस एजन्सीचे मुख्य वैशिष्टय म्हणजे जिथं गाडी जात नाही तिथं कर्मचारी वर्ग पोहोचले आणि गॅस जोडणी केली आहे.निर्माण होनार्‍या विविध शासनाच्या योजना तळागळात पोहोचवून त्या योजनेचा लाभ गोरगरिबांना मिळवून देण्यात अंजनी गॅस एजन्सी मुरबाड यशस्वी ठरली आहे.याच अंजनी गॅस एजन्सीनी मुरबाड तालुक्यातील नागरिकांना प्रथम प्राधान्य देत त्यांना नोकरीची संधी उपलब्ध करून दिली आहे.या मुरबाड अंजनी गॅस एजन्सीची सुरूवात श्री.सोमनाथभाऊ घरत यांनी केली असुन याच एजन्सीला आज ठाणे जिल्हयाच्या नकाशावर नाव कोरण्याची उत्कृष्ट कामगिरी त्यांचे सुपुत्र अभिजित घरत यांनी केली आहे.

या अंजनी गॅस एजन्सीत सकाळपासून अहोरात्र होईपर्यंत नागरिकांना सुविधा पुरविल्या जात असून कर्मचारी वर्ग नेहमी प्रगतशील राहिली आहे.कुठे काही अडचण निर्माण झाल्यास नागरिकांच्या हाकेची साथ असणार्‍या या अंजनी गॅस मुरबाड एजन्सीनी कधी नागरिकांची साथ सोडली नाही.आजही मोठया भावासारखे काम पाहणारे अंजनी गॅस एजन्सी जलदगतीत काम करित आहे.या एच.पी.गॅस मुरबाड एजन्सीने कोरोना काळातही चांगली कामगिरी केल्याप्रकरणी कोरोना योध्दा म्हणून त्यांचा गौरव करून सन्मानित करण्यात आले होते.एच.पी.गॅस कंपनीने याच ठाणे जिल्हयाच्या मुरबाडच्या श्री.सोमनाथ घरत यांचे अंजनी गॅस एजन्सीची 2020-2021 सालात निवड करित दादर येथील आयोजित केलेल्या कार्यक्रमात अभिजित घरत यांना एच.पी.गॅस कंपनीचे मालक यांचे हस्ते सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले आहे.या पुरस्काराचे सर्व श्रेय मुरबाड अंजनी गॅस च्या ग्राहकांना जात असल्याचे यावेळी अभिजित सोमनाथ घरत यांनी व्यासपिठावर असतांना दोन शब्द व्यक्त करतांना सांगितले.या पुरस्काराने मुरबाड शहरातील नागरिक आनंद व्यक्त केले असून पुढिल वाटचालीस शुभेच्छाही दिल्या आहेत.यावेळी श्री.सोमनाथभाऊ घरत,अभिजित सोमनाथ घरत,निखील भास्कर पडवळ,संजय रमेश घरत,पंढरीनाथ माळी आदी एजन्सी कर्मचारी तसेच अनेक राज्यातील मान्यवर यावेळी या कार्यक्रमास उपस्थित होते.

No comments