web-ads-yml-728x90

Breaking News

सोनटक्के गावातील पोलिस पाटील हल्ला प्रकरण ; आरोपींचा अटकपूर्व जामीन जिल्हा सत्र न्यायालयाने फेटाळला

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवभिंवडी,ठाणे

भिंवडी तालुक्यातील सोनटक्के गावातील पोलीस पाटील दिपक पाटील यांच्यवर गावातील गावगुंडांनी प्राणघात हल्ला केल्याची घटना एक महिन्यापूर्वी घडली आहे . या हल्यात पोलिस पाटील गंभीर जखमी झाले असून त्यांचा पाय फ्रॅक्चर झाला होता . याप्रकरणी गणेश मारूती भगत, रूपेश राजाराम भगत या दोघांविरोधात तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र मागील एक मिहिन्यांपासून गणेश मारूती भगत हा  आरोपी फरार असून आरोपींच्या मुसक्या आवळण्यात तालुका पोलिसांना यश आलेले नाही . त्याचबरोबर आरोपींकडून अटक पूर्व जमीन मिळावा यासाठी ठाणे जिल्हा सत्र न्यायालयात अर्ज करण्यात आला होता मात्र ठाणे जिल्हा सत्र न्यायालयाचे न्यायाधिश आर आर काकाणी यांनी  आरोपींचा अटक पूर्व जमीन देखील फेटाळला आहे . आरोपीचा अटकपूर्व जामिन फेटाळण्यात यावा या करीता सरकारी वकील श्री कडू,वाँचीग वकील अँड संध्या जाधव यांनी फिर्यादी ची बाजू सक्षम मांडून यूक्तीवाद केल्यामूले सत्र न्यायालयाने आरोपीचा अटकपूर्व जामिन रद्र केला आहे. आरोपी मात्र महिना उलटून अटकपूर्व  जमीन फेटाळूनही आरोपी मोकाट असल्याने पोलीस पाटील त्यांच्या कुटुंबीयांनी आरोपींच्या अटकेची मागणी केली आहे .

 

No comments