web-ads-yml-728x90

Breaking News

महिलां बचतगटांच्या विविध प्रशिक्षणासाठी शहापूर येथे प्रशिक्षण केंद्राची उभारणी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव - शहापूर

महाराष्ट्र राज्य ग्रामीण जीवनोन्नती अभियानांतर्गत महिलांना आर्थिक, सामाजिक सक्षम करण्यासाठी विविध उपक्रम, प्रशिक्षण राबवली जातात. यासाठी उत्तम प्रशिक्षण संकुलाची नेहमीच गरज भासते. ही गरज ओळखत ठाणे जिल्हा परिषदेच्या जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा विभागाने महिला आर्थिक विकास महामंडळाच्या सहकार्याने आणि राष्ट्रीय ग्रामीण आर्थिक परिवर्तन प्रकल्पामधून शहापूर येथे प्रशिक्षण केंद्र  उभारले असून नुकतेच प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे यांच्या शुभहस्ते केंद्राचे उदघाटन करण्यात आले. 

या प्रशिक्षण केंद्राचा फायदा जवळच्या सर्व तालुक्यातील प्रशिक्षणार्थीना होणार आहे तसेच बचतगटासंदर्भातील सर्व प्रशिक्षणाचे आयोजन येथे होणार असल्याने महिलांना आणि विविध केडरला याचा जास्तीत जास्त फायदा होणार आहे. शासकीय, निमशासकीय आस्थापनांची विविध प्रशिक्षणासाठी देखील हे केंद्र खुले असणार आहे. या प्रशिक्षण केंद्राच्या निगराणीची जबाबदारी स्वप्नपूर्ती लोक संचालित साधन केंद्र धसई  या प्रभागसंघाला देण्यात आली आहे. प्रशिक्षण केंद्राच्या माध्यमातून प्रभाग संघातील महिलाना शाश्वत आर्थिक स्रोत उपलब्ध झाला आहे. महिलांनी या वास्तूची  उत्तम देखभाल करून जास्तीत जास्त प्रशिक्षण शिबीरे या संकुलात कशी होतील यासाठी विशेष प्रयत्न करावेत  असे प्रकल्प संचालक छायादेवी शिसोदे  यांनी सांगितले. यावेळी सामाजिक कार्यकर्त्या विद्याताई वेखंडे, विभागीय सनियंत्रण व मूल्यमापन अधिकारी मंगेश सूर्यवंशी,जिल्हा अभियान व्यवस्थापक सारिका भोसले , अमित सय्यद, तालुका व्यवस्थापक शहापूर बाबासाहेब सावंत, उपजीविका सल्लागार  हृद्देश गायकर, ब्लॉक कॉर्डिनेटर गणपत लोंढे, उपस्थित होते. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक जिल्हा समन्वय अधिकारी अस्मिता मोहिते यांनी केले.

 

No comments