web-ads-yml-728x90

Breaking News

‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्र्यांच्या हस्ते लोकार्पण

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

सध्याचे युग माहिती आणि तंत्रज्ञानाचे युग आहे. ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’च्या माध्यमातून बारामती शहरातील नागरीकांच्या शासकीय, प्रशासकीय, वैद्यकीय, नागरी सुविधा, आपत्कालीन मदत अशा अनेक गरजा मोबाईलच्या एका ‘क्लिक’वर पूर्ण होणार आहेत. या ॲपच्या माध्यमातून बारामतीकरांच्या दैनंदिन गरजांची सुलभतेने पूर्तता करण्याचा प्रयत्न असून, या मध्यमातून त्यांचे दैनंदिन जीवन अधिक सुसह्य होईल, असा विश्वास उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी आज व्यक्त केला.येथील सह्याद्री अतिथीगृहात बारामती नगरपरिषद, आयसीआयसीआय फाऊंडेशन, रेव्हमॅक्स टेलिकॉम, उन्नती डिजिटल या संस्थांच्या संयुक्त प्रयत्नातून तयार करण्यात आलेल्या ‘डिजिटल बारामती अम्ब्रेला ॲप’चे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले. यावेळी आरोग्य मंत्री राजेश टोपे, मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार, बारामती नगरपरिषदेच्या नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, रेल्वेचे पोलीस आयुक्त कैसर खालिद, आयसीआयसीआय फौंडेशनचे विनीत रुंगटा, कौस्तुभ बुटाला उपस्थित होते.

No comments