web-ads-yml-728x90

Breaking News

आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट मार्फत पूरग्रस्त लघु व्यवसायिकांना मदत वाटप

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव महाड

महाड मध्ये आलेल्या महापुराने विस्कळीत मानवी जीवनाला कर्तव्य भावनेतून सुरू असलेली मदत आज देखील सुरू असून आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्टच्या माध्यमातून महाड मधील लघु व्यवसायिकांना मदत वाटप करण्यात आले.

आयडियल रिलीफ कमिटी ट्रस्ट मुंबई च्या माध्यमातून महाड मधील पूरग्रस्तांना मदत वाटप करण्यात आले. या कार्यक्रमास संस्थेचे चेअरमन जमीर कादरी, सचिव मजहर फारुख, जमाते इस्लामी हिंद (गोरेगाव) चे अमनोद्दीन इनामदार, कोकण संघटक अश्रफ हारून, सामाजिक कार्यकर्ते अस्लम पानसरी, दिलदार पूरकर, महाड पत्रकार संघाचे अध्यक्ष निलेश पवार, उपाध्यक्ष महेश शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते. महाड मधील जवळपास ६५ लघु व्यवसायिकांना आर्थिक आणि वस्तू स्वरूपात मदत वाटप करण्यात आली.

यावेळी बोलताना या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे जमीर कादरी यांनी आपल्या संपत्तीमधून जकात अदा करण्याचे इस्लामने सांगितले आहे. इस्लाम आपल्या मेहनतीने धन कमावण्याची शिकवण देतो. आलेल्या आपत्तीतून महाड मधील लघु व्यवसायिकांनी या मदतीच्या माध्यमातून पुन्हा उभे राहण्याची प्रेरणा घेतली पाहिजे असे सांगून ही मदत म्हणजे एक कर्तव्य आहे, आम्ही एक माध्यम म्हणून काम करतोय, आम्ही प्रसिद्धी साठी नाही तर जनसामान्य माणसाला उभे करण्याच काम यातून केलं जातंय. वातावरण बदलासाठी माणूसच जबाबदार आहे. वडणेर कमिटीच्या अहवालात नदी मार्ग अडवले जात आहेत असे स्पष्ट म्हटलंय, शिवाय फ्लड लाईन मध्ये काम केले जाते यात नदीचे काय चुकलं? असा सवाल करून प्रशासनाच्या कामकाजावर देखील नाराजी व्यक्त केली.

आयडियल रिलीफ च्या माध्यमातून महाड मधील तरुण लघु व्यवसायिकांना केल्या जाणाऱ्या मदतीबाबत सामाजिक कार्यकर्ते अस्लम पानसरे आणि मुफ्ती दिलदार पूरकर यांनी समाधान व्यक्त केले. हे काम इथेच संपलेले नसून मदतीचा हात जेथे जेथे आपत्ती निर्माण होईल त्या त्या वेळेस हे काम केले जाईल अशी भावना इनामदार यांनी व्यक्त केली. तर महाड मधील पूरग्रस्तांना उभे  करण्यात ज्या ज्या संस्थानि मदत केली त्यामध्ये मुस्लिम समाजातील संस्था, संघटना आणि दानशूर व्यक्तींचे मोलाचे योगदान राहिल्याचे निलेश पवार यांनी सांगितले. या संपूर्ण कार्यक्रमाचे प्रास्तावना अमनोद्दीन इनामदार यांनी केले.

No comments