web-ads-yml-728x90

Breaking News

टोकावडे ग्रामीण रुग्णालय बांधलेली निवासी इमारत अधिकारी विना ओस;शासनाच्या अडीच कोटीचा चुराडा

BY - युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

टोकावडे ग्रामीण रुग्णालय येथील निवासस्थानी एकही अधिकारी कर्मचारी निवासी राहतं नसल्याने ओस पडली आहे हे दुक्ष समोर आले आहे.नगर कल्याण माळशेज घाट महामार्ग लगत असलेल्या टोकावडे ग्रामीण रुग्णालय येथे अडीच कोटी रुपये खर्च करून मोठी इमारत बांधली असून येथे एकही अधिकारी कर्मचारी निवासी राहतं नसल्याने येथे माळशेज घाट असल्याने दररोज कुठे ना कुठे अपघात होतात यावेळी डॉक्टर कर्मचारी वॉडबॉय हे वेळेवर नसल्याने रुग्णांचे हाल होत आहेत 

            ही इमारत अधिकारी कर्मचारी यांच्या साठी निवासी राहण्यासाठी बांधली असून दोन वर्ष झाले येथे एकही अधिकारी कर्मचारी राहतं नसल्याचे निदर्शनास आले असून अजूनही येथे कर्मचारी यांच्या साठी निवास बिल्डीग येणार असल्याचे समजते पण हा एवढा खर्च करून एकाही अधिकारी कर्मचारी राहत नसल्याने शासनाचे पैसे फुकट जाणार अशी चर्चा चालू झाली आहे.तरी पण येणारी इमारत रद्द करा अशी मागणी ग्रामस्थांनी केली आहे.आहेत त्याच निवासस्थानी कर्मचारी राहत  नसताना नसलेल्या MS डॉक्टर करिता 27लाख रुपयांचे नवीन निवासस्थान बांधण्याचे टेंडर काढून येथील ठेकेदार लोकांनचे पोट भरण्याचे काम सुरू आहे

 एकाच इमारती वर लाखो रुपये खर्च करून शासनाचा निधी चा अपव्यय केला जात असून अधिकारी व ठेकेदार संघनमताने शासनाला फसवत असून ठेकेदार 22% कमी दराने काम घेत आहे ,ते कशा प्रतीचे असेल याची कल्पना न केलेलीच बरी

 

No comments