web-ads-yml-728x90

Breaking News

बोगस पत्रकारांची फळी वाढतंय का ?

(सौजन्य गुगल)
 

BY - नामदेव शेलार, युवा महाराष्ट्र लाइव - मुरबाड ,ठाणे

पत्रकार म्हणजे चौथा स्तंभ,जनसामान्यांचा आवाज आणि कणखर व निर्भिड लेखणीतुन अन्यायाला वाचा फोडून न्याय मिळवून देणारी तसेच शासनासमोर उघड सत्य मांडणारी पारदर्शक भूमिका बजावणारी आहे परंतु अलीकडे बोगस पत्रकारांची फळी ही निर्माण झाली आहे.शासनानी याकडे लक्ष केंद्रित केले नाही.बोगस डॉक्टरांबरोबर बोगस पत्रकारही वावरु लागले आहेत.काहींचे पेपर शासकीय यादीवर नसताना तसेच काळ्या यादीत गेले असताना त्या वृत्तपत्राचा पत्रकार म्हणून वावरत आहे.युट्युब चॕनेल अधिकृत न करता बातम्या गोळा करुन पत्रकारिता करीत आहे.अशा पत्रकारांची नोंद शासन दरबारी व जिल्हा माहिती अधिकारी यांचे कार्यालयात नाही.स्थानिक पातळीचा विचार केला तर ४० ते ५० पत्रकार पाहायला मिळतील परंतु यावर शासनाचे पारदर्शक लक्ष वेधले जात नाही.हेच काही बोगस पत्रकार एखाद्या संघात शिरकाव करत सामाजिक कार्यकर्ता म्हणून पत्रव्यवहार करीत असतात.एकीकडे पत्रकार म्हणून काम व दुसरीकडे सामाजिक कार्यकर्ता म्हणून सेटलमेंट घोडा पळवितात याकडे शासनानी लक्ष वेधणे म्हणून काळाची गरज व खऱ्या पत्रकारितेला जागृत ठेवता येईल.ठाजिमा.कार्यालयात अशा पत्रकारांची नोंद नाही तसेच स्थानिक पातळीवर पत्रकार म्हणून वावरत काही प्रतिष्ठित लोकांना त्रास देत एक प्रकारचे धंदे सुरु केले जातात त्यामुळे खरा पत्रकाराबरोबर त्या बोगस वृत्तीच्या पत्रकाराच्या यादीत गणना केली जाते त्यामुळे लोकशाहीच्या चौथा स्तंभाला शासनाचेच कवच मिळत नाही.आम्ही शासनाकडे यापहिलेही पत्रव्यवहार करुन खऱ्या पत्रकाराची ओळख जनतेला असावी म्हणून कळविलेही होते परंतु त्याचा विसर शासनाला झाला असून एकाच गावात २/३ पत्रकार तयार होत आहे.आम्ही खऱ्या पत्रकारांचा आदरच करतो परंतु बोगस पत्रकारांवर आळा घालणे ही शासनाची नैतिक जबाबदारी आहे आणि याच जबाबदारीची आठवण पुन्हा आम्ही करुन देत आहोत.शासकीय विभागात पत्रव्यवहार करणारा हा खरा पत्रकार आहे की नाही याचा माघोवा सर्वप्रथम करावा,एखाद्या प्रतिष्ठित व्यक्तीला पत्रकार व सामाजिक कार्यकर्ता म्हणून त्रास देण्याचा कारनामा केला जात आहे त्यामुळे अशा बोगस पत्रकारांची नोंद शासकीय यादीवर आहे की नाही याचा अभ्यासही शासनाने करायला हवा.अनेक जण पत्रकार सांगत सामाजिक कार्यकर्ता म्हणून पत्रव्यवहार करतात परंतु वास्तविक पाहता कायद्याचे ज्ञान कमी असल्यानेच बोगस वृत्तीचा तो पत्रकार हा सामाजिक कार्यकर्ता झाला आहे.माहिती अधिकारीतंर्गत माहिती प्राप्त करुन एकाच्याच पाठित खंजीर घोपसून चौथा स्तंभाला बदनाम करत आहे.सदरहू माहिती ही जनहितार्थ असून प्राप्त करुन घेतलेल्या माहितीचे अवलोकन न करता व प्रसिद्धी माध्यमातून प्रकट न करता बोगस पत्रकारांच्या एकमेकांत संगणमत करुन त्रास देण्याचे सत्र हाती घेतात त्यामुळे शासनानी अशा पत्रकारांवर लक्ष केंद्रित करुन त्यांची सर्वप्रथम चौकशी करावी व चौकशीत पत्रकार म्हणून बोगस असल्यास पी.आय.बी अॕक्ट नुसार कारवाई करावी.एखाद्या संघनेत शिरकाव करुन पत्रकार म्हणून सांगत त्या चांगल्या संघटनेला बदनाम करताना आढळून आल्यास त्या व्यक्तीला संघटनेतून हद्दपार करावा असे आवाहन संबंधित पत्रकार संघटनेला करीत आहोत.कारण संघटना ही जनसामान्यांसाठी आहे ना की स्वतःचा वापर करण्यासाठी.त्यामुळे संघटनेचे अध्यक्ष व संस्थापक यांनीही लक्ष केंद्रित केले पाहिजे.अध्यक्ष व संस्थापक यांच्या परवानगीनेच पाठपुरावा झाला पाहिजे नाहीतर खाली काय होते आणि वर कळत नाही आणि पुढे काय झाले तर अध्यक्ष व संस्थापकांना कळत नाही.त्यामुळे शासनानीही दखल घेऊन बोगस पत्रकारांची यादी जाहीर करुन खऱ्या पत्रकारांच्या मांगण्यावर लक्ष केंद्रित करावे.

 

No comments