web-ads-yml-728x90

Breaking News

डॉ. उज्वला चक्रदेव यांची नाथीबाई दामोदर ठाकरसी महिला विद्यापीठाच्या कुलगुरूपदी नियुक्ती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

नागपूर येथील मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चरच्या प्राचार्या  डॉ. उज्वला शिरीष  चक्रदेव यांची श्रीमती नाथीबाई दामोदर ठाकरसी (एसएनडीटी) महिला विद्यापीठाच्या  कुलगुरूपदी नियुक्ती करण्यात आली आहे.राज्यपाल तथा कुलपती भगत सिंह कोश्यारी यांनी  शनिवारी (दि.  11 सप्टें)  डॉ. उज्वला चक्रदेव यांची पाच वर्षांच्या कार्यकाळासाठी नियुक्ती जाहीर केली.डॉ. उज्वला चक्रदेव  (जन्म 27.08.1962 ) यांनी  राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या व्हीआरसीई येथून वास्तुविद्याशास्त्र  ही पदवी प्राप्त केली व त्यानंतर शहर नियोजन या विषयात एम. टेक. तसेच वास्तुविद्याशास्त्र शिक्षण या विषयात पीएच.डी. प्राप्त केली.डॉ. उज्वला चक्रदेव यांनी मनोरमाबाई मुंडले कॉलेज ऑफ आर्किटेक्चर येथे प्राध्यापक, प्राचार्य व पीएच.डी. पर्यवेक्षक म्हणून काम केले असून त्यांना अध्यापन, संशोधन व प्रशासन क्षेत्रात एकंदर 36 वर्षांचा अनुभव लाभला आहे.

No comments