web-ads-yml-728x90

Breaking News

२०२० पर्यंतची गुंठेवारी नियमित करण्याच्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई


पुणे आणि पिंपरी- चिंचवड महानगरपालिकेच्या हद्दीतील गुंठेवारीची प्रकरणे नियमित करण्याबाबत नगरविकास विभागाने निर्गमित केलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करण्याचे निर्देश नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज दिले.पुणे आणि पिंपरी चिंचवड महानगरपालिका हद्दीतील विविध विकासकामांचा नगरविकास मंत्री एकनाथ शिंदे यांनी सह्याद्री अतिथीगृह येथे आयोजित बैठकीत आढावा घेतला. या बैठकीस विधानपरिषदेच्या उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे, राज्यसभा खासदार संजय राऊत, नगरविकास विभागाचे प्रधान सचिव भूषण गगराणी आणि महेश पाठक यांचेसह पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रम कुमार, पिंपरी – चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त राजेश पाटील, शिवसेनेचे पुणे जिल्हाप्रमुख संजय मोरे आणि पिंपरी चिंचवड शहरप्रमुख सचिन भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.

No comments