web-ads-yml-728x90

Breaking News

पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू-काश्मिर उत्सूक; पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

जम्मू आणि काश्मिरमध्ये पुढील ४ ते ६ महिन्यात विविध सण, महोत्सव यांच्या पार्श्वभूमीवर पर्यटनाच्या विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. कोरोना प्रतिबंधात्मक सर्व प्रकारची काळजी घेण्यात येत असून पर्यटनाशी संबंधित घटकांचे ९५ टक्के तर पर्यटन विभागातील कर्मचाऱ्यांचे १०० टक्के लसीकरण करण्यात आले आहे. पर्यटकांनी जम्मू आणि काश्मिरमध्ये पर्यटनासाठी यावे, पर्यटकांच्या स्वागतासाठी जम्मू आणि काश्मिर तसेच तेथील लोक उत्सूक आहेत, असे आवाहन काश्मिरचे पर्यटन संचालक डॉ. जी. एन इटू आणि जम्मूचे पर्यटन संचालक विवेकानंद राय यांनी आज येथे केले.यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान येथे आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. ट्रॅव्हल एजन्ट्स असोसिएशन ऑफ काश्मिरचे अध्यक्ष फारुख कुथू, जम्मू आणि काश्मिरचे मुंबई येथील सहायक पर्यटन अधिकारी बशीर अहमद वानी यावेळी उपस्थित होते.

1 comment:

  1. दररोज मोफत शासकीय नौकरी ची माहिती साठी भेट द्या/ Free Government Jobs Alert- Naukri Kendra | नौकरी केंद्र

    ReplyDelete