web-ads-yml-728x90

Breaking News

१९७१ च्या युद्धातील विजयोत्सवानिमित्त ‘स्वर्णिम विजय मशाली’चे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केले स्वागत

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

भारताने १९७१ मधील पाकिस्तान विरोधातील युद्धात मिळविलेल्या विजयानिमित्त काढण्यात आलेल्या ‘स्वर्णिम विजय मशाली’चे आज मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते गेट-वे-ऑफ इंडिया येथे समारंभपूर्वक स्वागत करण्यात आले. ही मशाल दिल्ली येथून जैसलमेर, द्वारका, वडोदरा असे साडेचार हजार किमीचे अंतर पार करुन आज मुंबईत दाखल झाली.

यावेळी, राजशिष्टाचार मंत्री आदित्य ठाकरे, कृषीमंत्री दादाजी भुसे, गृह राज्यमंत्री सतेज ऊर्फ बंटी पाटील, मुख्यमंत्र्यांच्या पत्नी श्रीमती रश्मी ठाकरे, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव विकास खारगे तसेच लेफ्टनंट जनरल एस.के. प्राशर, एअर व्हॉईस मार्शल एस.आर. सिंग, वेस्टर्न नेव्हल कमांडचे व्हॉईस ॲडमिरल आर.हरिकुमार यांच्यासह तिन्ही दलांचे अधिकारी उपस्थित होते.

No comments