web-ads-yml-728x90

Breaking News

पंजाबमध्ये काँग्रेस नवीन मुख्यमंत्री निवडणार?

 


BY -   युवा महाराष्ट्र लाइव – मुंबई

पंजाब काँग्रेसच्या विधिमंडळ सदस्यांची तातडीनं बैठक घ्यावी, असं काही आमदारांनी सूचवलं होतं. त्यानुसार 18 सप्टेंबर रोजी संध्याकाळी 5 वाजता पंजाब प्रदेश कार्यालयात बैठक बोलावण्यात आली आहे. सर्व काँग्रेसच्या सर्व आमदारांनी तिथं उपस्थित राहावं," असं ट्वीट हरीश रावत यांनी केलंय.पंजाबमध्ये गेल्या काही दिवसांपासून मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह आणि पंजाब प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष नवज्योतसिंह सिंधू यांच्यात वाद सुरू आहे. त्यामुळे या बैठकीतून कॅ. अमरिंदर सिंह यांच्याबाबत काही निर्णय घेतला जातोय का, याबाबत तर्क-वितर्क राजकीय वर्तुळात व्यक्त होताना दिसतायेत.

No comments