web-ads-yml-728x90

Breaking News

कोविड प्रतिबंधक उपाययोजनांचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी घेतला आढावा

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कोविडच्या आपत्तीवर मात करण्यासाठी राज्यातील सर्व नागरिकांचे कोविड प्रतिबंधक लसीकरण लवकरात लवकर पूर्ण होण्याबाबत शासन प्रयत्नशील आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई उपनगर जिल्ह्यातील लसीकरणाचा पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आढावा घेतला. याबरोबरच कोरोनाच्या संभाव्य तिसऱ्या लाटेच्या प्रतिबंधासाठी आवश्यक सुविधांचाही त्यांनी आढावा घेतला.पर्यटन मंत्री तथा पालकमंत्री श्री.ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली मुंबई उपनगर जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीस जिल्हाधिकारी निधी चौधरी, महानगरपालिकेचे अतिरिक्त आयुक्त सुरेश काकाणी, संबंधित उपायुक्त आणि वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.श्री ठाकरे यांनी कोरोनाची संभाव्य तिसरी लाट आली तर त्याविरूद्ध लढण्यासाठी उपलब्ध असणारे बेड्स, ऑक्सिजन व इतर सुविधा यासंबंधी मुंबई महानगरपालिकेच्या उपाययोजनांचा आढावा घेतला. महिलांच्या लसीकरणाबाबतही त्यांनी माहिती घेतली. त्याचबरोबर व्हेक्टर बॉर्न डिसीजवर नियंत्रण मिळविण्याबाबत स्थानिक प्रशासन करीत असलेल्या उपाययोजनांबाबत यावेळी चर्चा करण्यात आली.

No comments