web-ads-yml-728x90

Breaking News

' मैं लिखूंगी क्योंकि, ये मुल्क मेरा भी है बसेरा, मैं लिखूंगी क्योंकि, स्याह रात में भी स्याही ला सकती है सवेरा - जिल्हाधिकारी निधी चौधरी

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

' मैं लिखूंगी क्योंकि, ये मुल्क मेरा भी है बसेरा, मैं लिखूंगी क्योंकि, स्याह रात में भी स्याही ला सकती है सवेरा ,' लेखणीच्या या क्रांतिकारी ओळी आहेत मुंबई उपनगराच्या नवीन जिल्हाधिकारी निधी चौधरी यांनी लिहिलेल्या कवितेच्या. मुळात राजस्थानमध्ये जन्मलेल्या आणि २०१२ च्या बॅचमधील महाराष्ट्र कॅडरच्या आयएएस अधिकारी निधी साहित्यिक प्रकृतीच्या असून एक कुशल प्रशासक असण्याव्यतिरिक्त त्या अनेकदा ब्लॉगवर कविता लिहून आपली सर्जनशीलता दर्शवितात.

रिझर्व्ह बँक राहिल्या, चित्रेही बनवली निधीने मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी म्हणून पदभार स्वीकारल्यानंतर इंटरनेशनल मारवाडी फेडरेशनच्या शिष्टमंडळाने राजस्थानच्या या प्रतिभावान मुलीचे सद्भावनेपूर्ण स्वागत केले. त्यांच्या वांद्रे कार्यालयात झालेल्या या सदिच्छा भेटीत संस्थेच्या अध्यक्षा सुमन आर अग्रवाल, रोटरी गव्हर्नर डॉ. राजेंद्र गुप्ता, तेरापंथी सभा (मुंबई) चे उपाध्यक्ष सुरेश राठोड, अग्रोहा विकास ट्रस्टचे संजय मित्तल, अखिल भारतिय अग्रवाल सम्मेलनाचे विरेंद्र मित्तल, रंजना गुप्ता, बबिता मित्तल इत्यादी मान्यवरांचा समावेश होता. वर्ष 2006 मध्ये रिझर्व्ह बँकेत कार्यरत असलेल्या निधी यांनी कवितांसह भारतीय पौराणिक कथांपासून चित्रपटांपर्यंत लिहिल्या असून 105 चित्रेही बनवली आहेत. यात 25 चित्रे फक्त महात्मा बुद्धांवर बनवली गेली. अद्विन व अद्विज या दोन मुलांची आई निधी केवळ तिच्या कुटुंबासाठी जबाबदार नाहीत, तर त्या समाजाशीही सखोल संबंधित आहेत आणि वेळोवेळी त्यांच्या अधिकृत गोष्ट्या शेअर करत असतात. एका सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेल्या निधीची सर्व भावंडे नागरी सेवेत आहेत. त्याची बहीण विधीची IPS मध्ये निवड झाली आहे आणि भाऊ IAS मध्ये 222 क्रमांकावर आहे. निधी त्यांपैकी सर्वात मोठी आहे. वडील सोमदत्त नेहरा (चौधरी) राजस्थानच्या सुमेरपूर येथील पाणीपुरवठा विभागात एईएन म्हणून कार्यरत राहिले आहेत.

 

No comments