web-ads-yml-728x90

Breaking News

कल्याण वाहतुक पोलीसांची स्टेशन परिसरातील नियम मोडणाऱ्या मुजोर रिक्षा चालकांवर धडक कारवाई

 

BY - युवा महाराष्ट्र लाइव - कल्याण

कल्याण रेल्वे स्टेशन परिसरातील बेशिस्त रिक्षाचालकांमुळे इतर वाहन चालकांना वाहतूक कोंडीला सामोरे जावे लागत होते. यामध्ये विना परमिट, विना परवाना, विना गणवेश रिक्षा चालवू नका असे आवाहन करत नियम मोडणाऱ्या रिक्षा चालकांवर कारवाई होईल असा कल्याणच्या वाहतूक पोलिसांनी रिक्षा चालकांना १० दिवसांचा फतवा काढून अलटीमेटम देत कारवाईचा इशारा दिला होता. अखेर आज दिनांक १ सप्टेंबर २०२१ पासून 'कल्याण शहर वाहतूक पोलीस' आणि 'कल्याण आरटीओ' च्या संयुक्त विद्यमाने आजपासून रिक्षाचालकांवर धडक कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. कल्याण स्टेशन परिसरात वाहतुकीला कोंडी करत रस्ता अडविणाऱ्या विना परमिट, विना परवाना, विना गणवेश आणि बेशिस्त मुजोर रिक्षाचालकांवर कारवाईचा बडगा उगारत तब्बल ६०० रिक्षा तपासत ९० रिक्षावर दंडात्मक कारवाई करण्यात आली. या पुढे ही कारवाई सुरु राहील असे वाहतूक पोलिसांकडून प्रसिद्धी माध्यमांना सांगण्यात आले आहे.

No comments