web-ads-yml-728x90

Breaking News

देशातील टॉप १० शाळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या शाळांचा समावेश व्हावा – पालकमंत्री आदित्य ठाकरे

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

बृहन्मुंबई महापालिका, शिक्षक, विविध स्वयंसेवी संस्था आदी सर्वांच्या सहभागातून महापालिका शाळांची मोठ्या प्रमाणात दर्जोन्नती आणि गुणवत्तेमध्ये वाढ झाली आहे. या शाळांमधील गळतीही कमी झाली असून आता प्रवेशासाठी मागणी वाढली आहे. येत्या काळात देशातील टॉप १० शाळांमध्ये बृहन्मुंबई महापालिकेच्या कमीतकमी ५ शाळांचा समावेश व्हावा यासाठी सर्वजण मिळून प्रयत्न करुया, असे आवाहन मुंबई उपनगर जिल्ह्याचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी केले.पेहले अक्षर फाउंडेशन आणि महापालिकेमार्फत शिक्षकांच्या प्रशिक्षणाची मोठी मोहीम राबविण्यात आली. यात सहभागी शिक्षकांना आज ऑनलाईन पद्धतीने सन्मानित करण्यात आले, त्यावेळी पालकमंत्री श्री. ठाकरे बोलत होते. यावेळी महापालिका शिक्षण समिती अध्यक्षा संध्या दोशी, मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, सहआयुक्त अजित कुंभार, शिक्षणाधिकारी राजू तडवी, पेहले अक्षर फाउंडेशनच्या संस्थापिका राधा गोयंका, प्रकल्प प्रमुख परिता शाह यांच्यासह प्रशिक्षणात सहभागी शिक्षक ऑनलाईन पद्धतीने उपस्थित होते.

No comments