web-ads-yml-728x90

Breaking News

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त राज्य सरकार देणार विविध सवलती – ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांची माहिती

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

अपारंपरिक ऊर्जा प्रकल्पांसाठी सर्वसाधारण कार्यपद्धती निश्चित करण्याला आज ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी मंजुरी दिली. राज्यात अपारंपरिक ऊर्जा प्रकल्प राबवू इच्छिणाऱ्या कंपन्यांना ऑनलाईन वेब पोर्टलच्या माध्यमातून अर्ज करण्याची आणि त्यांच्या अर्जावर कालबद्ध प्रक्रिया करण्याची यंत्रणा तात्काळ उभारण्याचे निर्देशही डॉ. राऊत यांनी दिले आहेत.अपारंपरिक ऊर्जा धोरणाच्या अंमलबजावणीसाठी महाऊर्जा (मेडा) ला नोडल एजंसी नियुक्त करण्यात आले आहे.भारतीय स्वातंत्र्याच्या सुवर्ण महोत्सवानिमित्त राज्यात अपारंपरिक ऊर्जेच्या प्रसारावर भर देण्याचे राज्य शासनाने ठरविले आहे. या धोरणाची वेगवान अंमलबजावणी व्हावी आणि या क्षेत्रात गुंतवणूक करू इच्छिणाऱ्या कंपन्यांना जमीन व आवश्यक इतर मान्यता लवकरात लवकर मिळाव्यात यासाठी एक कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीला आज ऊर्जामंत्री डॉ. राऊत यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या सुकाणू समितीच्या बैठकीत मान्यता दिली.

No comments