web-ads-yml-728x90

Breaking News

मोहन नळदकर महसुलचा वसुली वाझे ? जिल्हाधिकारी बढतीसाठी कुळवहिवाट शेतकर्‍याना खोटा न्याय

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव भिवंडी, ठाणे

भिवंडी तालुक्यातील खारबाव गावातील तब्बल ७९ एकरपेक्षा अधिक शेतजमिनीच्या सातबारावर पाचशेपेक्षा अधिक शेतकऱ्याीच्या नावे आहेत. मात्र शेतकऱ्यांच्या नावे असलेल्या सातबारावरील शेतकऱ्यांची नावे महसूल विभागाने कमी करून केवळ सावकाराची नावे लावल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. आता याविरोधात भूमिहीन होणाऱ्या शेकडो शेतकऱ्यांनी आपल्या बांधावर जाऊन आक्रोश आंदोलन करून या गंभीर प्रश्नांकडे राज्य सरकारचे लक्ष वेधले आहे. भिवंडी तालुक्यातील खारबाव येथील शेतकरी गेल्या शंभर वर्षांपासून त्यांच्या ताब्यातील जमीन कसत असून भाताचे उत्पन्न घेत आहे. मात्र त्यांच्या शेतजमिनीच्या सातबारावर सावकाराचे नाव असताना शेतकऱ्यांचे सुद्धा कूळ म्हणून नाव आहे. त्यातच शेती वाचविण्यासाठी गेल्या अनेक वर्षांपासून पीडित शेतकरी न्यायालयीन लढाई लढत आहेत.

             मात्र अचानक भिवंडीचे प्रांताधिकारी मोहन नळदकर यांची बदली झाल्याच्या पूर्व संध्येला शेतकऱ्यांची नावे वगळून फक्त सावकाराचे नाव ठेवण्याची ऑर्डर दिल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. प्रांताधिकाऱ्यांनी घाईघाईने काढलेल्या ऑर्डरविरोधात खारबाव गावातील शेकडो शेतकरी भूमिहीन झाल्याच्या निषेधार्थ आक्रोश आंदोलन करण्यात आले. गेली 100 वर्षे पुर्वीपासुन शेतकरी कसत असलेल्या जमिनी 1956 च्या कुळकायदयात शेतकरी साधे कुळ झालेले फेरफार नोंदी 7 12 वर आमंल दिला नाही याचा गैरफायदा घेत सावकाराच्या मुलानी कुळाच्या जमिनीची विक्री तात्कालीन प्रांत अधिकारी गणेश जगताप यांच्या पत्नीच्या नांवे विक्री केली मात्र विक्री करताना कुळाचा फेरफार रद्द केला नाही.

राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार

   त्या विरोधात उपविभागीय अधिकारी मोहन नळदकर यांच्या न्यायालयात शेतकर्यानी दावा दाखल केला गेले तीन वर्षे दावा केसेत एकही दिवस सावकार हजर राहिले नसताना प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी सावकाराच्या बाजुने निर्णय देवुन आजपर्यंत कसत असलेल्या कुळवाहिवाट शेतकर्यावर अन्याय केला आहे.जिल्हाधिकारी प्रमोशन होण्यासाठी मोहन नळदकर यांनी सावकाराच्या बाजुने दिलेल्या निर्णयाची शासनाने चौकशी करावी अशी मांगणी राष्ट्रीय संघटना स्वतंत्र संपादक पत्रकार संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष नामदेव शेलार यांनी केली आहे.

   मोहन नळदकर यांच्या कार्यकाळात भादाणे तळवली ग्रामपंचायत हद्दीतील शासनाच्या शेकडो एकर महसुली जागेत बेकायदेशीर दगडखाणी उत्खन्न करून 100 कोटीच्यावर शासनाची रॉयल्टी चोरी झाली आहे त्याच्या तक्रारी अनेकवेळा करून कारवा केली नाही त्याचा वुसली वाझे मोहन नळदकर तर नाही ना ? असा सवाल शेतकर्यानी केला असुन मोहन नळदकर यांनी शेतकर्याना डावळून दिलेले खोटे निर्णय जमिन श्रेत्र वाढीचे बनवले 7 12 आदेश याची चौकशी होऊन आकार  बंदला श्रेत्र नसताना प्रांत अधिकारी मोहन नळदकर यांनी कोणत्या पुराव्यावर निर्णय दिले या सर्व गौडबंगाल करणार्या प्रांत अधिकारी मोहन नळदकर याची चौकशी करून शासनाने कारवा करावी कुळाच्या जमिनी शेतकर्याना परत मिळाव्यात अशी मांगणी शेतकर्यानी केली आहे. आंदोलनावेळी पीडित शेतकऱ्यांनी वेळ पडली तर आत्महत्या करू, असा इशारा राज्य सरकारला दिला आहे. या प्रकरणाच्या चौकशीसह दोषींवर कारवाईची मागणी त्यांनी केली आहे.

No comments