web-ads-yml-728x90

Breaking News

पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांची संकल्पना;मुरबाड पोलिसांची रात्रभर रिंगरोड पेट्रोलिंग

 


BY - गौरव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड,ठाणे

मुरबाड शहरात गेले काही वर्षे बंद असलेली पेट्रोलिंग मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी रिंगरोड पध्दतीने सुरू केल्याने नागरिकांनी सुटकेचा श्वास सोडला आहे.

  शहरात छोटया मोठया चोर्याचा सत्र रात्रीच्यावेळी सुरू झाला होता त्याचे वृत्तकंन करताना आमच्या मिडियातुन रात्रीची पेट्रोलिंग सुरू करण्याची मांगणी केली होती.जनमाणसाच्या सुरक्षाची मांगणीची गंभीर दखल मुरबाड पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक प्रसाद पांढरे यांनी घेवुन रात्री दोन वाहाने पेट्रोलिंगसाठी रात्रभर ठेवल्याने मुरबाड शहरात चोरटयांचे धाबे दनानले आहेत.

       नागरिकांनी पोलिसाना साथ देण्यासाठी आपली कर्तबदारी म्हणुन पोलिसव्हॅन आल्यावर घरासमोरचा ब्लप लाईट लावावी जेणेकरून चोर पळताना रस्त्यावर पकडता येईल अशा सुसज्ज संकल्पनेतुन मुरबाडकराना सुरक्षतेचा समाधान लाभला आहे.

   मुरबाडचे चोर्या मार्या होण्याचा कारण येथे मटका जुगार वॉईनशॉप आहे हे धंदे सध्या बंद आहेत सांगतात परंन्तु पोलिसानी अशा धंदयाना कायमचा चाप लावावा जेनेकरून मुरबाडची सुरक्षा अबाधित राहिल.

  प्रसाद पांढरे याचं प्रशासकीय काम चोख कर्तबगारी आहे.क्राईमब्रांच मध्ये चांगले काम केलेले अधिकारी म्हणुन त्यांची ख्याती आहे.सामान्य माणसाला न्यायीक भुमिका बजावुन एक कर्तव्यदक्ष अधिकारी म्हणुन त्यांच्याकडे महाराष्ट्रात पाहिले जातयं.

     मुरबाड बाजारपेठेतील व्यापारी ज्वेलर्सवाले नागरिक सार्याना अपेक्षित अशी पोलिसांची ग्रस्त गलीबोळातुन रात्री शहराच्या चौफेर घातली जाते.गुन्हेगाराना जुगारे मटकावाले दारूडे चोरटे यांच्यावर कडक कारवाईसाठी वरिष्ठ पोलिस अधिकारी प्रसाद पांढरे कार्यरत आहेत त्याबद्दल नागरिकांनी समाधान व्यक्त करून आम्ही सुध्दा पोलिसांच्या चांगल्या कामगिरीसोबत आहोत असे सांगितले आहे.

No comments