web-ads-yml-728x90

Breaking News

जिल्हा वार्षिक योजनेतून सातारा पोलीस दलासाठी १० कोटींचा निधी – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY -  युवा महाराष्ट्र लाइव सातारा

पोलिसांकडून चांगल्या कामाची अपेक्षा करीत असताना त्यांना उत्तम पायाभूत सुविधा देणे ही शासनाची जबाबदारी असून सातारा पोलीस दलाच्या गरजा पूर्ण करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत 10 कोटींचा वाढीव निधी देण्यात येईल, असे प्रतिपादन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.वडूज येथील पोलीस स्टेशनच्या नूतन इमारतीच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाला विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर,  सहकार मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृह राज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार श्रनिवास पाटील, खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर, आमदार महेश शिंदे, जिल्हा परिषदेचे अध्यक्ष उदय कबुले, विशेष पोलीस महानिरीक्षक मनोजकुमार लोहिया, जिल्हाधिकारी शेखर सिंह, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल, अप्पर पोलीस अधिक्षक अजित बोराडे, जिल्हा परिषदेचे उपाध्यक्ष प्रदिप विधाते, शिक्षण सभापती मानसिंग जगदाळे,  आपत्ती व्यवस्थापन समिती सदस्य प्रभाकर देशमुख, सुनील माने आदी उपस्थित होते.

No comments