web-ads-yml-728x90

Breaking News

सुसज्ज यंत्रणा तज्ञ डॉक्टरांचा हॉस्पीटल मुरबाड जोगेश्वरी आळीत

 


BY - गौरव शेलार,युवा  महाराष्ट्र  लाइवमुरबाड,ठाणे

गेली अनेक वर्षे गोर गरीब सामान्य् रूग्णावर उपचार करणारे डॉ. धीरज श्रीवास्तव यांनी त्याचे सहकारी डॉ. अभिजित इंगळे, डॉ. महेश महिरे  यांच्या मदतीने भव्य दिव्य दीर्घायू हॉस्पीटल जोगेश्वरी आळी मुरबाड(Murbad) येथे सुरू केले आहे. 

          गोर गरिबांना अल्प दरात आरोग्य् सेवा देणारे तज्ञ डॉक्टर धीरज श्रीवास्तव यांनी त्यांच्या सहकारी डॉक्टर् डॉ. अभिजित इंगळे, डॉ. महेश महिरे  यांना बरोबर घेवुन सर्व आजारावर उपचार यंत्रणा उभी केले आहे. ग्रामीण जनतेची जाण असणारी हॉस्पीटल शहरात हवी आहेत. गोर गरिबांना आधार निर्माण होणारी आरोग्य यंत्रणा हवी अशी अपेक्षा जनमाणसाची होती. आज दीर्घायू हॉस्पीटल रूपाने पुर्ण झाली आहे.सदर दीर्घायू हॉस्पीटलचे भव्य दिव्य उद्घाटन आमदार किसनराव कथोरे यांच्या शुभहस्ते झाले या उद्घाटनाला  विविध क्षेत्रातील मान्यवरांनी हजेरी लावली भविष्यात आरोग्यावर मात करण्यासाठी विविध उपाययोजना शिबिरे आयोजित केली जातील असा विश्वास डॉ. धीरज श्रीवास्तव यांनी व्यक्त केला. 

उद्घाटन प्रसंगी ज्येष्ठ पत्रकार तथा राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे अध्यक्ष नामदेव शेलार यांनी सर्व डॉक्टरचे अभिनंदन करून जनमाणसाच्या सेवेला आपुला यथा शक्ती हातभार लागेल अशी आशा व्यक्त केली आहे.

No comments