web-ads-yml-728x90

Breaking News

अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे गृहमंत्र्यांचे निर्देश

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

राज्यात अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायद्याची प्रभावी अंमलबजावणी आणि जनजागृती करण्याचे निर्देश गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी दिले. तसेच गृह विभागामार्फत 11 पोलीस आयुक्तालय व 34 जिल्हास्तरावर असे एकूण 45 अनैतिक मानवी वाहतूक प्रतिबंध कक्षांची स्थापना करण्यात आली असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले.अनैतिक मानवी व्यापार प्रतिबंध कायदा 1956 अंतर्गत कारवाईच्या प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा बैठक गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या अध्यक्षतेखाली आणि महिला व बालविकास मंत्री यशोमती ठाकूर यांच्या उपस्थितीत मंत्रालयात झाली. या बैठकीसाठी अपर मुख्य सचिव मनुकुमार श्रीवास्तव, पोलीस महासंचालक संजय पांडे, प्रधान सचिव संजय सक्सेना यांसह वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.या अधिनियमातील तरतुदीनुसार विशेष पोलीस अधिकारी म्हणून पोलीस निरीक्षक यांनाच बळीताच्या सुटकेच्या कार्यवाहीचे अधिकार आहेत. प्रशासकीय कारणास्तव पोलीस निरीक्षक यांचेसह सहाय्यक पोलीस निरीक्षक यांना सुद्धा विशेष पोलिस अधिकारी म्हणून नियुक्त करण्याबाबतचा प्रस्ताव शासनास सादर करण्यास यावेळी मान्यता देण्यात आली. तसेच सर्व सहायक पोलीस आयुक्त, पोलीस उप अधीक्षक व अपर पोलीस अधीक्षक यांना ट्रॅफिकिंग पोलीस ऑफिसर नेमण्याबाबत गृह विभागाने केंद्रीय गृह मंत्रालयाकडे पाठपुरावा करण्याचे निर्देशही देण्यात आले.

No comments