web-ads-yml-728x90

Breaking News

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या इमारतीमध्ये नवे नवे उद्यौग

BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड, ठाणे

मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनधिकृत व्यापरी संकुलात शेती पुरक दुकाने एैवजी नवे  नवे उद्यौग व्यवसायाचे दुकाने चालवली जात असुन आता चक्क युवा कौशल्य पॅरामेडिकल इन्स्टीटयुटचे क्लासेस चालवले जात आहेत.यापुर्वी याच ठिकाणी दिशा पॅरामेडिकल इन्स्टीटयुटचे क्लासेस सुध्दा थाटले गेले आहे.

शासनाने शेतकयासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीची स्थापना केली शासनाचा भुखंड कृषी पूरक शेती उत्पादन साठवण करण्यासाठी गोडावुन व्यापारी गाले बांधण्याची परवानगी दिली मात्र मुरबाडच्या कृषी उत्पन्न बाजार समितीचे चेअरमन सचिव संचालकानी शासकीय भुखंडाचा वापर शेतकर्यासाठी करता खाजगी व्यापारी गाले तसेच शेतीपूरक दुकाने सेाडुन अन्य कमर्शियल दुकानाना प्राधान्य दिल्याने शासनाचे मोठे मोठे भुखंड गिळगुत करण्याचा सपाटा लावला आहे.

     मुरबाड कृषी उत्पन्न बाजार समितीच्या अनाधिकृत इमारतीमध्ये नव्याने नर्सिंग क्लासेस डॉक्टरी संस्थेच्या शाखा उघडण्यात आल्या आहेत त्यांना शासनाने परवानगी कशी दिली मग शेतकर्याना शेतीमालाच्या विक्रीसाठी गाले का दिले जात नाहीत याची चौकशी शासनाने करून त्या इमारतीला टाळे लावण्याची मांगणी शेतकर्यानी केली आहे.

   कृषी उत्पन्न बाजार समितीची सरकारी रूग्णालयासमोरील व्यापारी गाल्याची इमारत अनाधिकृत आहे तीला पणन मंडळाची परवानगी नाही तसेच ज्या दोन इमारतीला पणन मंडळाची परवानगी आहे त्याच बिल्डींग मध्ये गाले वाढवुन त्याची विक्री केली आहे मात्र 5 ते 8 लाखापर्यंत विक्री केलेल्या गाल्याना एक हजार नामधारी भाडा आकरला जात आहे.

 कृषी उत्पन्न बाजार समितीची तिसरी बिल्डींगच्या अनाधिकृत म्हणुन मुरबाड नगरपंचायत कडुन कर आकारणी करून विद्युत पुरवठा दिला आहे.सदरची जागा महसुल विभागाची असुन शासनाने सदर बिल्डींग ताब्यात घ्यावी अन्यथा निष्कासीत करावी या इमारतीमधील व्यापारी गाले लिलाव पध्दतीने दर पाच वर्षानी शेतकर्याना शेतीपुरक व्यापाराला देण्यात यावे.

भुखंड हाडप करून कोटी रूपायाचा गोलमाल करणार्या चेअरमन सचिव दोषींवर फौजदारी गुन्हे दाखल करावे अशी शेतकर्यांची मांगणी असुन शासनाकडे कारवाईची मांगणी केली आहे.

No comments