web-ads-yml-728x90

Breaking News

डोंबिवलीतील बलात्कार प्रकरणाचा विद्यार्थी भारती कडून कल्याणात निषेध;मानपाडा पोलीस ठाण्यात कडक कारवाई करण्यास दिले निवेदन

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवडोंबिवली,ठाणे

देशात अनेक ठिकाणी तसेच महाराष्ट्रात सुद्धा दिवसेंदिवस बलात्काराच्या प्रकरणांमध्ये वाढ होत आहे.  डोंबिवलीत भोपर गावात  15 वर्षीय मुलीवरील सामूहिक बलात्काराने संपूर्ण राज्याला हादरवून सोडले आहे. ह्या प्रकरणात एकूण 30 गुन्हेगार सामील आहेत . येत्या प्रत्येक दिवशी अश्या बातम्या वाचून अस्वस्थता वाढत चालली आहे. ह्या सर्व प्रकाराचा शेवट केव्हा असेल ह्याचं उत्तर कुठेच सापडत नाही . सदर प्रकरणाबद्दल कारवाई करण्यात यावी याकरिता विद्यार्थी भारती टीमने मानपाडा पोलीस ठाण्यात निवेदन दिले. अशी माहिती विद्यार्थी भारती राज्यध्यक्षा पूजा मुधाने यांनी दिली.

         सोबतच आज दुपारी 11:30 वाजता कल्याण वेस्ट  तहसीलदार कार्यालयावर विद्यार्थी भारती तर्फे घडलेल्या प्रकरणाचा निषेध नोंदवत कल्याण मध्ये विविध ठिकाणी काउन्सिलिंग  सेंटर उभे रहावेत अशी मागणीही करण्यात आली. ह्या सगळ्या गोष्टी थांबवण्यासाठी तरुण पिढीने पुढे यावे  असे आव्हान विद्यार्थी भारती राष्ट्रीय अध्यक्षा मंजिरी धुरी यांनी केले.ही घटना प्रचंड लाजिरवाणी असून ह्यासाठी ग्रामपंचायत लेव्हल वर गाव पातळीवर महिलांच्या सुरक्षेसाठी व्यवस्था असावी . तसेच काउंसीलिंग सेन्टर्स उभारल्या जाव्यात ह्या मागणीचे समर्थन करत   घडलेल्या प्रकाराचा निषेध नोंदवत कल्याण ईस्ट चे माजी नगरसेवक कल्याण विकासिनी चे अध्यक्ष ऍड. उदय भाऊ रसाळ म्हणाले.

No comments