web-ads-yml-728x90

Breaking News

निर्मिती संस्थांना लॉकडाऊन कालावधीतील मूळ निर्धारीत भाड्याच्या ४० टक्क्यांपर्यंत सवलत मिळणार – सांस्कृतिक कार्यमंत्री अमित देशमुख

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

कोविडच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात सुरक्षिततेच्या कारणास्तव लॉकडाऊन करण्यात आला होता. या काळात वेगवेगळ्या माध्यमांतील चित्रीकरण बंद असल्याने निर्मिती संस्थांना आर्थिक नुकसान सहन करावे लागले होते. त्यामुळे निर्मिती संस्थांना चित्रीकरण स्थळाच्या आणि दीर्घ मुदतवाढ तत्वावरील संस्थांच्या भाड्यात दि. 15 एप्रिल 2021 ते 6 जून 2021 या कालावधीकरीता सवलत देण्यात येणार असून ही सवलत मूळ निर्धारीत भाड्याच्या 40 टक्क्यांपर्यंत असेल, अशी माहिती सांस्कृतिक कार्य मंत्री अमित देशमुख यांनी दिली.महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाच्या संचालक मंडळाची 158 वी बैठक ऑनलाईन पद्धतीने आज आयोजित करण्यात आली होती. सदर बैठकीस श्री. सौरभ विजय, सचिव, सांस्कृतिक कार्य, महाराष्ट्र चित्रपट, रंगभूमी आणि सांस्कृतिक विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक कैलास पगारे आणि सह व्यवस्थापकीय संचालक कुमार खैरे यांच्यासह सांस्कृतिक कार्य विभागाचे तसेच महामंडळाचे अधिकारी उपस्थित होते.

No comments