web-ads-yml-728x90

Breaking News

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा – उपमुख्यमंत्री अजित पवार

 


BY - युवा महाराष्ट्र लाइव मुंबई

विद्यार्थ्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन रुजविण्यासोबत त्यांना कौशल्य विकासाचे प्रशिक्षण देण्यासाठी शैक्षणिक संस्थांनी पुढाकार घ्यावा, असे प्रतिपादन उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केले.आकुर्डी येथील डी.वाय.पाटील ज्ञानशांती शाळेचे उद्घाटन उपमुख्यमंत्री श्री.पवार यांच्या हस्ते झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी गृहराज्यमंत्री तथा डॉ.डी.वाय.पाटील शैक्षणिक संकुलाचे उपाध्यक्ष सतेज पाटील, अध्यक्ष संजय पाटील, आमदार ऋतूराज पाटील, डी वाय पाटील इंटरनॅशनल युनिव्हर्सिटीचे कुलगुरू डॉ.प्रभात रंजन, डी वाय पाटील शैक्षणिक संकुलाचे विश्वस्त तेजस पाटील, संकुल संचालक डॉ.नीरज व्यवहारे, ज्ञानशांती शाळेच्या मुख्याध्यापिका गीता पिल्ले आदी उपस्थित होते.

No comments