web-ads-yml-728x90

Breaking News

शहरातील फेरीवाले, अनधिकृत बांधकामांवर महापालिकेची धडक कारवाई

 


BY - युवा  महाराष्ट्र  लाइवठाणे

ठाणे महापालिकेच्यावतीने प्रभाग समितीनिहाय अनधिकृत बांधकामांवर कारवाईची धडक मोहिम सुरुच असून आज विविध ठिकाणी फेरीवाले तसेच अनधिकृत बांधकामांवर कारवाई करण्यात आली. सदरची कारवाई ठाणे महापालिका आयुक्त डॉ. विपिन शर्मा यांच्या आदेशांन्वये करण्यात आली.

या कारवाईतंर्गत नौपाडा कोपरी प्रभाग समितीमधील आलोक हाँटेल,गावदेवी तीन हात नाका, हरिनिवास सर्कल, राम मारुती रोड ,तलावपाळी येथील फेरीवाले हटविण्यात आले. तसेच स्टेशन परिसर, जुनी महानगरपालिका,सुभाष पथ,जांभळी नाका, कोर्ट नाका, संकल्प चौक, रघुनाथ नगर, हाजुरी, एल आय सी ऑफिस रोड, नाखवा हायस्कूल, ठाणेकर वाडी, कोपरी कॉलनी, भाजी मार्केट, स्टेशन रोड, नारायण कोळी चौक, अष्टविनायक चौक व मंगला हायस्कूल नाका येथील फेरीवाले हटवून सामान जप्त करण्यात आले.

कळवा प्रभाग समितीमधील विठ्ठल मंदिर रोड खारेगाव येथील ९० फिट रोड, पारसिकनगर परिसरातील फेरीवाल्यांना हटविण्याची कारवाई करण्यात आली. दिवा प्रभाग समितीमधील खान कंपाऊंड, दिवा पूर्व येथील श्री. सद्दाम यांचे वाढीव अनधिकृत बांधकाम निष्कासीत करण्यात आले.

कळवा प्रभाग समिती मधील अल्सफा इमारती जवळ टाकोळी मोहल्ला येथील तळ अधिक 9 मजली अनधिकृत इमारतीतील अंतर्गत बांधकाम निष्कासीत करण्यात आले.तसेच लोकमान्य- सावरकरनगर प्रभाग समिती अंतर्गत येत असेल्या डवले नगर मैदानातील कमानीचा धोकादायक भाग गॅस कटरच्या साहाय्याने तोडण्यात आला.

उथळसर प्रभाग समितीमधील नितीन कंपनी सर्व्हिस रोड, कॅडबरी जंक्शन सर्व्हिस रोड येथील अनधिकृरित्या नो पर्किंगमध्ये पार्क केलेल्या वाहनांना जॅमर लावण्याची कारवाई करण्यात आली.

दरम्यान वर्तकनगर प्रभाग समितीमधील जवाहर नगर, आनंद बाजार, मुरली बार, कापुरबावडी नाका, लॉकिम कंपनी, मोर मॉलच्या समोर, जीबीरोड हायवे सर्विस रोड, म्हाडा वसाहत येथील गुलाब चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर सी १ आणि सी २ (A) धोकादायक इमारतीचे पाहणी करण्यात आली आहे. तसेच वर्तकनगर नाका , कॅडबरी नाका ते माजीवडा नाका ते वसंत विहार सर्कल पर्यंत फेरीवाले हटविण्यात आले

सदरची कारवाई अतिक्रमण नियंत्रण व निष्कासन विभागाच्या उप आयुक्त अश्विनी वाघमळे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक आयुक्त शंकर पाटोळे, संतोष वझरकर, सचिन बोरसे, अलका खैरे, महेश आहेर, समीर जाधव आणि विजयकुमार जाधव यांनी अतिक्रमण विभागाचे कर्मचारी आणि पोलीस यांच्या साहाय्याने केली

No comments