web-ads-yml-728x90

Breaking News

जेएनपिटी च्या 6 कोटी रुपयांच्या सिएसआर फंडाचे वाटप;लोकनेते दि.बा.पाटील इंजीनीअरींग काॅलेजसाठी रुपये 1 कोटी 80 लाख

 


BY -  विठ्ठल ममताबादे, युवा महाराष्ट्र लाइव – उरण

जेनपीटी विश्वस्त मंडळाची मीटिंग  जेएनपिटी ऍडमिनीस्ट्रेटीव्ह बिल्डींग येथे संपन्न  झाली.त्यामधे जेएनपिटीचा  एकूण 6 कोटीं रुपयांचा सिएसआर फंड वाटप करण्याचा निर्णय घेण्यात आला.त्या पैकी 2 कोटी 5 लाख रुपये हे उरण तालुक्यासाठी देण्यात आले आहेत.तर उर्वरीत 3 कोटी 95 लाख उर्वरीत रायगड जिल्ह्यात वाटप होणार आहेत.त्यामूळे उरणकरांचा लोकनेते दि.बा. पाटील इंजीनियरिंग कॉलेजच स्वप्न साकार होणार आहे.जेएनपिटी विश्वस्त कॉम.भूषण पाटील यांनी यासाठी विवीध मार्गाने आनेक महिने प्रयत्न केले होते.त्यासाठी त्यांना दुसरे कामगार विश्वस्त दिनेश पाटील यांचीही मोलाची साथ लाभली.शिवसेनेचे द्रोणागिरी शाखेचे अध्यक्ष जगजीवन भोईर यांनीही यासाठी विशेष प्रयत्न केले.यांसर्वांनी केलेल्या अथक प्रयत्नांना या बैठकीमध्ये यश आले आहे.या 6 कोटी पैकी 2 कोटी 5 लाख रुपये फंड उरण साठी तर  उर्वरीत 3 कोटी 95 लाख उर्वरीत रायगड जिल्ह्या मधील निरनिराळ्या संस्थांना देण्यात आला. 

उरण मध्ये देण्यात आलेल्या सिएसआर फंडापैकी लोकनेते दि.बा. पाटील इंजीनियरिंग कॉलेज साठी रु.1 कोटी 80 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत.ते दरवर्षी रु.60 लाख प्रमाणे देण्यात येणार आहेत.तर भविष्यात अशीच मदत उरण मधील इतर खाजगी बंदरांकडूनही  देण्यात येणार आहे. तसेच द्रोणगीरी स्पोर्ट्स आसोशिएशनला रु.15 लाख, महिलांना सॅनेटरी नॅपकीन साठी व सावरकर विद्यालय नविन शेवा साठी प्रसाधनगृह बांधण्यासाठी एकूण  रु.10 लाख देण्यात येणार आहेत. यावेळी जेएनपिटी विश्वस्त भूषण पाटील यांनी  हनुमान कोळीवाड्याच्या  पुनर्वसनाचा प्रश्न उपस्थीत केला असता, जेएनपिटी चेअरमन संजय सेठी यांनी मिटींग घेउन सदर  सोडविणार आसल्याचे संगितले.

No comments