web-ads-yml-728x90

Breaking News

श्री श्रेत्र टाकेश्‍वर मठाधिपती प.पु.श्री.फुलनाथ महाराज उपस्थितीत भव्यदिव्य महादेव शंकराच्या मुर्तीची मुरबाड मध्ये मिरवणुक आमदार किसनराव कथोरे कमळ किसनराव कथोरे यांची उपस्थिती 3 सप्टेंबरला प्राणप्रतिष्ठा सोहळा 5 सप्टेंबरला लोकार्पण सोहळा

 


BY - नामदेव शेलार,युवा महाराष्ट्र लाइव मुरबाड ,ठाणे

मुरबाड शहरातील शास्त्रीनगर तरंगत तलावात आमदार किसनराव कथोरे यांच्या पुढाकाराने भव्य दिव्य भोलेनाथ भगवान शंकराची (bholenath shankar ) भव्यदिव्य मुर्ती बसवण्यात आली असुन मुर्ती प्रतिष्ठाण शुक्रवारी 3 सप्टेंबर तर लोकार्पण सोहळा 5 सप्टेंबरला संपन्न करण्यासाठी शहरातील नागरिकानी जंगी तयारी केली.

     भगवान महादेव शंकराच्या मुर्तीचा भव्यदिव्य मिरवणूक मुरबाड शहरातुन श्री श्रेत्र टाकेश्वर मठाधिपती .पु.श्री.फुलनाथबाबा महाराज आमदार किसनराव कथोरे सौ.कमळ किसनराव कथोरे वारकरी सांप्रदाय भजनी मंडळ मान्यवरांच्या उपस्थितीत श्रीरामाच्या भजन गजरात काढण्यात आली.विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे यावेळी आयोजन करण्यात आले होते.या सोहळयात सर्व पक्षिय सामाजिक शहरवासिय संपुर्ण तालुक्यातील भक्तगण सामील झाले होते.

   उल्हासभाऊ बांगर नितीन मोहपे सर जयवंत सुर्यराव अनंत कथोरे अनिल घरत सुहास मोरे माजी नगराध्यक्ष किसन कथोरे नारायण गोंधळी जयवंत कराळे सर यांच्यासह अनेक भक्तगण सामील झाले होते.मुरबाड शहराला एक आगळा वेगळा लुक तयार करून देण्याचा संकल्प आमदार किसनराव कथोरे यांनी गेल्या 10 वर्षात करून दिला आहे.पर्यटन पर्यावरण तलावसुशोभिकरण सुसज्ज बाजारपेठ क्राँक्रिटरस्ते कमानी रोड लाईट अशी अनेक कामे करून मुरबाड शहराला भव्यदिव्य दर्जा निर्माण केला आहे.त्यातच भव्यदिव्य भोलेनाथ शंकराची मुर्ती तलावात बसवुन मुरबाड शहराला वेगळेच पर्यटण सौंदय निर्माण करून दिला त्यामध्ये कोणत्याही प्रकारचे राजकारण नाही हीच त्यांच्या विकासाची गुरूकिल्ली समजली जात आहे.

    सर्वानी एकत्र येवुन सुचनादर्शक काम करून घ्यावे आपल्या गावाला शहराला इतिहासीक ठेवा निर्माण व्हावा हीच त्यांची नेहमी अपेक्षा आहे.त्याचप्रमाणे सार्या मुरबाड शहरातील नागरिकानी या भव्यदिव्य कार्याक्रमाला हजेरी लावली श्रावण महिण्यात मुरबाड शहर तालुक्याला देवाचा देव महादेव श्री शंकराचे तिर्थस्थान तलावात लाभले हे मुरबाडकराचं भाग्यचं आहे.

No comments